WhatsApp यूजर्ससाठी आनंदाची बातमी: फक्त आवाज द्या आणि हवे तसे हाय-क्वालिटी फोटो तयार करून घ्या

जर तुम्ही OpenAI च्या ChatGPT चा वापर करत असाल, तर आता तुमचा WhatsApp वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. ChatGPT ने WhatsApp वापरणाऱ्या कोट्यवधी यूजर्ससाठी एक धमाकेदार फीचर लॉन्च केले आहे. आता यूजर्स फक्त बोलून हवे तसे फोटो तयार करू शकतात! यामुळे WhatsApp वर काम करणं अधिक सुलभ होणार आहे.

पूर्वी ही सेवा फक्त ChatGPT च्या वेबसाइट किंवा अ‍ॅपवर मर्यादित होती. मात्र आता OpenAI ने अधिकृतरीत्या ही सुविधा WhatsApp वरही दिली आहे.

ChatGPT चं धमाकेदार अपडेट

OpenAI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती शेअर केली. त्यानुसार, आता वापरकर्ते WhatsApp चॅटदरम्यान फक्त आवाजात कमांड देऊन प्रतिमा (image) तयार करू शकतात. कमांड दिल्यानंतर केवळ 2 मिनिटांत ChatGPT हाय-क्वालिटी फोटो तयार करून देतो.

फोटो जनरेट करण्यासाठी काय करावं लागेल?

जर तुम्हाला WhatsApp वर हा ChatGPT image generation टूल वापरायचा असेल, तर तुम्हाला तुमचं OpenAI अकाउंट लिंक करणं आवश्यक आहे. जर तुम्ही अकाउंट लिंक केलं नाही, तर तुम्हाला एका दिवसात केवळ एकच फोटो जनरेट करता येईल.

हे फीचर आल्यामुळे यूजर्स फक्त बोलेल्या प्रश्नांची उत्तरेच मिळवू शकणार नाहीत, तर कोणत्याही प्रकारचा फोटो सुद्धा फक्त आवाजात तयार करून घेऊ शकणार आहेत. शिवाय, तयार फोटोबद्दल सविस्तर माहितीही ChatGPT देऊ शकेल.

WhatsApp वर ChatGPT वापरण्याची पद्धत

1. तुमच्या फोनच्या Contact List मध्ये +1-800-242-8478 हा नंबर सेव करा.

2. नंतर OpenAI कडून मिळालेल्या लिंकवर क्लिक करा.

3. WhatsApp कॉन्टॅक्ट्स रिफ्रेश करा.

4. आता तुम्ही ChatGPT ला थेट WhatsApp वरून मेसेज करून प्रश्न विचारू शकता.

जर तुम्ही अमेरिका किंवा कॅनडा मध्ये राहत असाल, तर तुम्ही या नंबरवर कॉलही करू शकता आणि ChatGPT शी थेट संवाद साधू शकता. मात्र, कॉलिंगसाठी महिन्याची मर्यादा केवळ 15 मिनिटांपर्यंत असणार आहे. हे नविन फीचर WhatsApp वर संवाद व कंटेंट क्रिएशनच्या दृष्टीने एक क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवते.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News