HEATWAVE : महाराष्ट्र तापला, पारा 45 अंशांच्या पार; काळजी घ्या!

महाराष्ट्रात ऊन्हाचा पारा 45 अंशांचा पार पोहोचला आहे. राज्यातील वातावरण तापल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे...

मुंबई: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, विशेषतः कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे, कमाल तापमान वाढू शकते. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने सांगितले आहे. काही जिल्ह्यांत ऊन्हाचा पारा 45 अंशांच्या पार जाऊन पोहोचला आहे. हीू निश्चितच चिंतेची बाब आहे.

भुसावळात 45 डिग्री:

गेल्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रातील भुसावळातील तापमान 45 अंशांच्या आसपास असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा उद्रेक झाल्याचे बघायला मिळत असून जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू झाली आहे. भुसावळ तालुक्यात तापमानाचा पारा 45 अंशा वर जाऊन पोहचल्याचे चित्र आहे. एकूण राज्यात अशीच परिस्थिती आहे.

अशी घ्या काळजी:

संतुलित आहार घ्या:

गरमीमुळे शरीरातील उष्णता वाढते. म्हणून या दिवसात शरीराला थंडावा मिळणं अत्यंत गरजेच असतं, म्हणून योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे या दिवसात तेलकट आणि तिखट पदार्थ खाणं टाळा. दुपारीच्या जेवणात काकडी,दही,ताक, लस्सी आणि फळांचा ज्युस पिणं फायदेशीर ठरतं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जिऱ्याचं किंवा धन्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. या दिवसांमध्ये अनेकांना युरीनरी इंफेक्शन होतं म्हणूनत रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही सब्जाचं पाणी प्यायल्याने किडनी संबंधित आजार दूर होतात.  प्रचंड ऊन असल्याने दिवसभरात तीन ते चार लीटर पाणी पिणं शरीरासाठी आवश्यक आहे.

त्वचेची काळजी घ्या

कडकडीत ऊन असल्याने घामामुळे त्वचारोग होण्याची शक्यता दाट असते. म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. शक्य झाल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याने स्वच्छ अंघोळ करा. त्वचारोग होऊ नये यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन थेंब कापूर किंवा नीलगिरीचं तेल टाकू शकता. तसंच रात्री झोपताना स्वच्छ आणि मोकळे कपडे वापरा. शक्यतो या दिवसात झिन्स किंवा जाडसर कपडे वापरणं टाळावं. यामुळे शरीराचे होणार बरेच नुकसान टाळता येते.

शरीर थंड ठेवा

या दिवसात शरीराला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं आहे. उपवास आणि वातावरणातील वाढत जाणाऱ्या तापमानामुळे अशक्तपणा येण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच या दिवसात नारळपाणी पिणं फायदेशीर ठरतं. नारळपाण्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. तसंच अशक्तपणा आणि पित्त वाढू नये यासाठी तुम्ही दिवसातून दोनवेळा नारळपाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News