सोशल मीडिया कंपनी Meta ने Facebook वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, येत्या काही महिन्यांपासून Facebook वर अपलोड होणारे सर्व व्हिडीओ मग ते लहान असोत वा लांब फक्त Reels फॉरमॅटमध्येच प्रकाशित केले जातील.
Meta चा असे करण्याचा उद्देश, वापरकर्ते कसा व्हिडीओ कंटेंट तयार करतात आणि पाहतात यामध्ये एकसंधता आणणे आणि संपूर्ण अनुभव अधिक सुलभ करणे हा आहे.

आता फक्त एकच व्हिडीओ सिस्टीम
याआधी Facebook Reels फक्त उभ्या (vertical) आणि लहान व्हिडीओंसाठी मर्यादित होत्या. मात्र, नवीन अपडेटनंतर लांब आणि आडवे (horizontal) व्हिडीओ देखील Reels स्वरूपात स्वीकारले जातील. यासोबतच प्रायव्हसी सेटिंग्ज आणि पब्लिशिंग कंट्रोलमध्येही बदल करण्यात येणार आहेत.
प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये महत्त्वाचे बदल
Meta ने सांगितले की, आता Feed आणि Reels दोघांनाही एकसारख्या प्रायव्हसी सेटिंग्ज लागू होतील. म्हणजे वापरकर्त्यांनी पूर्वी निवडलेली प्रायव्हसी पॉलिसी सर्व व्हिडीओ कंटेंटसाठी लागू राहील.
नवीन सिस्टिम लागू होण्याच्या वेळी वापरकर्त्यांना त्यांच्या सेटिंग्जचे रिव्ह्यू करण्याचा सल्ला दिला जाईल, जेणेकरून त्यांचे व्हिडीओ फक्त इच्छित प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. मग ते मित्र असोत, खास ग्रुप असो किंवा सर्वसामान्य जनता.
हा बदल फेसबुकच्या व्हिडीओ प्लॅटफॉर्मसाठी एक मोठं पाऊल मानलं जात आहे, कारण यामुळे व्हिडीओ अनुभव आणखी सरळ, आधुनिक आणि reels-केंद्रित बनणार आहे.