“शबाना आणि मी रस्त्यावर झोपतो…” जावेद अख्तर यांची पाकिस्तानी अभिनेत्रीला सणसणीत चपराक, संपूर्ण प्रकरण काय? वाचा

जावेद अख्तर यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची तीव्र निंदा करत सरकारकडे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर बुशरा अंसारी भडकल्या होत्या.

Javed Akhtar On Bushra Ansari : पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अंसारी यांनी काही काळापूर्वी जावेद अख्तर यांच्यावर एक टिप्पणी केली होती आणि म्हटले होते की त्यांना मुंबईत भाड्याने घर देखील मिळत नाही. यावर आता जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खरंतर, जावेद अख्तर यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची तीव्र निंदा करत सरकारकडे पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर बुशरा अंसारी भडकल्या होत्या. त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करत म्हटले होते की, त्यांना तर मुंबईत भाड्यानेही घर मिळत नाही. कोणीही त्यांना घर देत नाही.

यावर आता जावेद अख्तर यांनी ‘द लल्लनटॉप’ ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी सुरुवातीला विचारले, “तुम्ही कोण आहेत मला सांगणारे की मी काय बोलावे आणि काय नाही?”

जावेद अख्तर यांचे बुशरा अन्सारीला सडेतोड उत्तर

जावेद अख्तर यांनी पुढे बोलताना म्हटले, “एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, बुशरा अन्सारी. त्या वारंवार माझ्याबद्दल काही ना काही बोलत असतात. एकदा त्यांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी म्हटले होते की, ‘नसीरुद्दीन शाह शांत राहतात, तुम्हीही तसेच रहावे.’”

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “माझा त्यांच्याकडे प्रश्न आहे की, त्या कोण आहेत मला सांगणाऱ्या की मी कधी बोलावं आणि कधी नाही? तुम्हाला हा अधिकार कुणी दिला? आणि तुम्हाला का वाटतं की मी तुमचा सल्ला मानावाच? भारतात आमच्यात काही समस्या असू शकतात, पण जेव्हा कुणी बाहेरचा माणूस टिप्पणी करतो, तेव्हा मी एक भारतीय आहे. त्या लोकांना हे का आठवत नाही? मी गप्प बसणार नाही.”

मी आणि शबाना रस्त्यांवर झोपतो

जेव्हा जावेद अख्तर यांना विचारण्यात आले, की बुशरा अन्सारी यांनी दावा केला आहे, की तुम्हाला मुंबईत भाड्याने घरसुद्धा मिळत नाही, तेव्हा त्यांनी व्यंगात्मक पद्धतीने उत्तर दिले, जावेद अख्तर म्हणाले की, “हो, बरोबर आहे, शबाना आझमी आणि मी रस्त्यावर झोपतोय. काय यार, आता काय बोलायचं?

नेमकं प्रकरण काय?

यानंतर जावेद अख्तर यांनी त्या प्रसंगाचा उल्लेख केला, ज्यामुळे बुशरा अन्सारी यांनी त्यांच्यावर ही टिप्पणी केली होती. ते म्हणाले, “सुमारे २५ वर्षांपूर्वी शबानाला गुंतवणुकीसाठी एक फ्लॅट घ्यायचा होता. पण ब्रोकर्स म्हणाले की मालक आपले घर कोणत्याही मुसलमानाला विकणार नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याने नकार का दिला? कारण त्यांचे आईवडील सिंधमध्ये राहत होते, जिथून या पाकिस्तानी लोकांनी त्यांना हाकलून दिले होते.”

शबानाला फ्लॅट नाकारण्याचे कारण तिचे मुसलमान असणे नव्हते”  जावेद अख्तर

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “इतकी मोठी आणि खोलवर जखम दिल्यावर कोणतीही व्यक्ती त्या मालकासारखंच वागेल. जर त्या दिवशी शबानाला फ्लॅट देण्यास नकार दिला गेला, तर त्याचे कारण ती मुसलमान आहे हे नव्हतं. तर ते कारण हे होते की त्या मालकाला आपल्या आईवडिलांसोबत जे काही झाले, त्याचा संताप कुठेतरी काढायचा होता.”

ते पुढे म्हणाले, “मग ही बुशरा अन्सारी कोण आहे जी यावर टीका करते आणि मला गप राहण्याचा सल्ला देते? तिने टीका करण्यापूर्वी स्वतःच्या घरात डोकावायला हवे.”


About Author

Rohit Jernavare

Other Latest News