Janhvi Kapoor: जान्हवी कपूरला कुणी गिफ्ट केली कोटींची लॅम्बोर्गिनी, नाव ऐकून वाटेल आश्चर्य

Janhvi Kapoor News: जान्हवी कपूरला गिफ्ट मिळाली कोटींची लॅम्बोर्गिनी, कुणी दिली माहितेय?

Janhvi Kapoor Viral Video:  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला नुकतीच एक खास भेट मिळाली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी अभिनेत्रीला लॅम्बोर्गिनी तिच्या मुंबईतील घरी पोहोचवण्यात आली. ही कार अत्यंत मौल्यवान मानली जात आहे. तिची किंमत ४ ते ९ कोटींच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे ही कार जान्हवीला तिची जवळची मैत्रीण अनन्या बिर्ला हिने भेट दिली आहे.

गाडीसोबत एक मोठा गिफ्ट बॉक्सही पाठवण्यात आला होता. जो गाडीच्या रंगाशी अगदी जुळत होता आणि त्यावर टॅगसुद्धा लिहिण्यात आला होता:हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला होता. यामध्ये भेट मिळालेली नवी गाडी जान्हवीच्या घरी आणताना दिसून येत आहे आहे .

 

अभिनेत्रीचं लक्झरी कार कलेक्शन-

लिलाक लॅम्बोर्गिनी आता जान्हवी कपूरच्या आलिशान कार कलेक्शनचा भाग बनली आहे. अभिनेत्रीकडे आधीच अनेक महागड्या आणि लक्झरी कार आहेत. या कलेक्शनबाबत सांगायचं झालं तर यामध्ये, टोयोटा लेक्सस – किंमत सुमारे २.५ कोटी, मर्सिडीज GLE २५०D – किंमत ६७.१५ लाख, BMW X5 – किंमत ९५.९ लाख, मर्सिडीज बेंझ ए-क्लास – किंमत १.६२ कोटी. या कलेक्शनमध्ये लॅम्बोर्गिनीचा मॅट पर्पल लूक एक विशेष आकर्षण बनला आहे. सध्या सोशल मीडियावर जान्हवीच्या या कारची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

जान्हवीला भेट देणारी व्यक्ती कोण?

जान्हवीची जवळची मैत्रीण असलेली अनन्या बिर्ला ही केवळ एका उद्योगपतीची मुलगी नाही. तर ती स्वतः एक यशस्वी उद्योजक आणि संगीतकार देखील आहे. ती कुमार मंगलम बिर्ला आणि नीरजा बिर्ला यांची लेक आहे. २०१६ मध्ये, अनन्याने आपले पहिले इंग्रजी संगीत एकल लिव्हिन द लाइफ रिलीज केलेहोते. जे जिम बेंझ यांनी निर्मित केले होते. यानंतर, मींट टू बी सारख्या गाण्यांमुळे ती पहिली भारतीय कलाकार बनली जिचे इंग्रजी गाणे आंतरराष्ट्रीय चार्टवर पोहोचू शकले. अनन्याचा एक विशिष्ट चाहतावर्ग आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoom TV (@zoomtv)

चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, जान्हवी कपूर नुकतीच तेलुगू चित्रपट ‘देवरा- भाग १’ आणि हिंदी चित्रपट ‘उलझ’ मध्ये दिसलीहोती. सध्या ती ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ आणि ‘परम सुंदरी’ या दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
याशिवाय जान्हवीचा आणखी एक खास चित्रपट ”होमबाउंड” देखील चर्चेत आहे. ज्यामध्ये ती एक खास भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २०२५ च्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या ‘अन सर्टेन रिगार्ड’ विभागात निवडला गेला आहे. नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात ईशान खट्टर आणि विशाल जेठवा देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने वरुण ग्रोव्हर आणि सोमेश मिश्रा यांच्यासोबत केली आहे. एकंदरीतच जान्हवी अनेक प्रोजेक्ट्ससोबत भेटीला येणार आहे.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News