फेब्रुवारी 2018 मध्ये जेव्हा श्रीदेवी यांचं निधन झालं, तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर आता बोनी कपूर यांनी मौन सोडलं आहे.
दुबईला एका कौटुंबिक लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचा काही वर्षांपूर्वी बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला. यानंतर अनेकांनी त्यांच्या अशा मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले. तर काही लोकांनी म्हटले की त्यांनी आत्महत्या केली आहे. त्याच वेळी, काहींनी अभिनेत्रीचे पती बोनी कपूर यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला कारण हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. पण पत्नीच्या मृत्यूच्या पाच वर्षांनंतर, बोनी कपूर यांनी द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. की श्रीदेवी यांना नेहमीच लो बीपीची समस्या असायची कारण त्या कठीण डाएट पालन करत होत्या.
श्रीदेवी यांचा कडक डाएट
बोनी कपूर म्हणाले, “ती अनेकदा उपाशी राहायची. कारण तिला चांगले दिसायचे होते. पडद्यावर चांगले दिसावे म्हणून आपल्याला आपल्या प्रकृतीचा सांभाळ करावा लागेल असे तिचे मत होते. तिने माझ्याशी लग्न केल्यापासून तिला अनेकदा चक्कर आली होती आणि डॉक्टर तिला लो बिपी असल्याचे सांगत राहिले. दुर्दैवाने, तिने ते गांभीर्याने घेतले नाही आणि ही घटना घडेपर्यंत ते इतके गंभीर नसावे असे तिला वाटले.
बाथरुममध्ये पडून दात तुटले
“बोनी पुढे म्हणाले, “हे दुर्दैवी होते. नंतर जेव्हा तिचे निधन झाले, तेव्हा नागार्जुन त्यांचे सांत्वन करण्यासाठी घरी आले आणि त्यांनी मला सांगितले की तिच्या एका चित्रपटादरम्यान, ती तेव्हाही क्रॅश डाएटवर होती आणि अशाच प्रकारे ती बाथरूममध्ये पडली आणि तिचा दात तुटला होता.” त्याच मुलाखतीत, बोनी कपूर यांनी असेही उघड केले की श्रीदेवीच्या मृत्यूनंतर, त्यांची लाय डिटेक्टर टेस्ट घेण्यात आली ज्यामध्ये त्यांची २४ ते ४८ तास चौकशी करण्यात आली कारण भारतीय माध्यमांकडून त्यांच्यावर खूप दबाव होता. यानंतर दुबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आणि श्रीदेवीचा मृत्यू अपघाती असल्याचे उघड केले.