क्योंकी सास भी कभी बहू थी चा दुसरा सीझन येणार, ‘तुलसी’च्या भूमिकेत दिसणार स्मृति ईरानी, Z+ सुरक्षा व्यवस्थेत शूटिंग करणार

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 : एकता कपूर यांनी ज्या दिवसापासून ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ ची घोषणा केली आहे, त्यादिवसापासून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रेक्षकांना या नव्या सीझनच्या कलाकारांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता, की ओरिजिनल ‘तुलसी’ म्हणजेच स्मृति ईरानी आणि ‘मिहिर’ची भूमिका साकारणारे अमर उपाध्याय हेही दुसऱ्या सीझनमध्ये झळकणार आहेत.

दरम्यान, आता स्मृति ईरानीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्मृति क्योंकि सास भी कभी बहू थी 2 चं शूटिंग Z+ सुरक्षा व्यवस्थेत करणार आहेत. इतकेच नाही तर सेटवरील प्रत्येकाचा फोन टॅप केला जाणार असल्याचेही सांगितले आहे.

Z+ सुरक्षा व्यवस्थेत शूटिंग करणार स्मृति ईरानी

एका रिपोर्टनुसार, स्मृति ईरानी या मालिकेचे शूटिंग Z+ सिक्योरिटीच्या घेरावात करणार आहेत. तसेच सेटवर येणाऱ्या-जाणाऱ्यांवर मर्यादा घालण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त सेटवर कोणालाही फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल

सेटवर उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. कारण ‘सास भी कभी बहू थी’ च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. अशा परिस्थितीत, हा २००० च्या दशकातील सर्वाधिक पसंतीचा शो बनला. स्मृती इराणी व्यतिरिक्त, रोनित रॉय, हितेन तेजवानी आणि सुधा शिवपुरी सारखे कलाकार या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते.

८ वर्षं चालली सीरियल

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचे प्रसारण स्टार प्लसवर सलग ८ वर्षं झाले होते. IMDb च्या माहितीनुसार, या शोने एकूण ४७ पुरस्कार आपल्या नावावर केले होते. आता क्योंकि सास भी कभी बहू थी २ ला देखील प्रेक्षकांकडून तितकेच प्रेम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्मृती ईरानी या शोमध्ये दिसणार, याला आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे. मात्र उर्वरित कलाकार कोण असणार, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News