Big Boss : सलमान खान याचा वादग्रस्त शो बिग बॉसचा १९वा सीझन येत असल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर आतापासूनच या सीझनमध्ये कोण-कोण झळकणार? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. यावेळी बिग बॉसचा फॉरमॅट मागील सर्व सीझन्सपेक्षा वेगळा असणार आहे, कारण हा शो ३ नव्हे तर ५ महिन्यांपेक्षा अधिक काळ टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.
गेल्या काही वर्षांत, बिग बॉसच्या घरात केवळ टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सच नाही तर युट्यूबर्सनीही बरीच चर्चा आणि वाद निर्माण केले होते. कुठेतरी, सोशल मीडियावरील स्टार्सनी टीव्ही आणि सिनेमातील स्टार्सना मागे टाकले आहे. तथापि, आता निर्माते त्यांच्या नवीन सीझनच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल करणार आहेत, याचा त्यांच्या टीआरपीवर किती परिणाम होईल, हे शो सुरू झाल्यावरच कळेल.

बिग बॉस १९ मध्ये सर्वात मोठा बदल काय असेल?
मागील सीझन्सच्या टीआरपीचा विचार करता, आता निर्माते एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, या सीझनमध्ये कोणत्याही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर किंवा यूट्यूबर्सना शोमध्ये एंट्री मिळणार नाही.
यावेळी निर्माते त्यांच्या जुन्या फॉरमॅटची पुनरावृत्ती करताना दिसतील आणि या वादग्रस्त शोमध्ये फक्त टीव्ही स्टार्स आणि बॉलिवूड स्टार्सनाच स्थान देतील. वृत्तांनुसार, निर्मात्यांनी यासाठी तयारी देखील सुरू केली आहे आणि ते शोसाठी टीव्हीच्या प्रसिद्ध चेहऱ्यांशी संपर्क साधत आहेत.
बिग बॉसच्या गेल्या काही सीझनमध्ये, निर्मात्यांनी एल्विश यादव, अभिषेक मल्हान, मनीषा राणी, रजत दलाल, एमसी स्टॅन सारख्या अनेक व्यक्तिरेखांना आणले होते, जेणेकरून शोचा टीआरपी वाढेल. राष्ट्रीय टीव्हीवर आल्याने इन्फ्लुएंसर्स चेफॉलोअर्स निश्चितच वाढले, परंतु टीआरपी अनुपमा आणि अनेक डेली सोप शोना मागे टाकून नंबर वन स्थानावर येऊ शकला नाही, त्यामुळे निर्मात्यांनी आता ही रणनीती स्वीकारली आहे.
बिग बॉस सीझन १९ कधी ऑन एअर होणार?
बिग बॉस सीजन १९च्या रिलीज डेटबद्दल बोलायचं झालं, तर सलमान खान जूनच्या अखेरीस या शोचा प्रोमो शूट करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, हा सीजन जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ऑन एअर होण्याची शक्यता आहे.