‘फुले’ चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मणांबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपने जाहीर माफी मागितली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा, अनुराग कश्यपने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ब्राह्मण समाजावर केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे. अनुराग कश्यप यांनी ब्राह्मण समुदायाबद्दल केलेल्या विधानानंतर सर्वत्र गोंधळ उडाला आहे. अनुरागविरुद्ध मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अनुराग कश्यपने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर केली.

अनुरागची पोस्ट
अनुरागने इन्स्टाग्रामवर नव्याने पोस्ट केली आहे. त्याने त्याच्या शैलीतच त्याचा माफीनामा दिला आहे. ही माझी माफी आहे. त्या पोस्टसाठी नाही, तर त्या एका ओळीसाठी जी संदर्भाबाहेर घेतली गेली आहे आणि द्वेष निर्माण करत आहे. यामध्ये त्याने आपल्या कुटुंबाला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं उघड केलं आहे. कोणतीही कृती किंवा भाषण माझी मुलगी, कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांना मिळणाऱ्या रेप आणि खुनाच्या धमकीहून मोठं नाही. बोललेले शब्द परत मागे घेतले जाऊ शकत नाहीत. मी घेणार नाही. मला शिव्या द्यायच्या तर द्या, असं अनुरागने म्हटलं आहे.
नेमका वाद कशावरुन?
“ब्राह्मण तुम्हारे बाप हैं. जितना तुम्हारी उनसे सुलगेगी उतना तुम्हारी सुलगाएंगे (ब्राह्मण तुमचे बाप आहेत. तुम्ही जितके त्यांच्याशी पंगा घ्याल, तितके जास्त त्यात पोळले जाल)” असं म्हणणाऱ्या एका सोशल मीडिया युजरला उत्तर देताना कश्यप म्हणाला, “ब्राह्मण पे मैं मुतुंगा.. कोई प्रॉब्लेम? (मी ब्राह्मणांवर लघवी करेन… काही समस्या आहे का?)” अनुराग कश्यपच्या या कमेंटवरुन मोठा वाद निर्माण झाला.
माफी हवीय, मग घ्या
“जर तुम्ही माफी मागत असाल तर ही माझी माफी आहे,” असे त्यांनी ब्राह्मण समुदायाला आवाहन केले. ब्राह्मणांनो, कृपया महिलांना एकटे सोडा. केवळ मनुस्मृतीच नाही तर धर्मग्रंथही इतकी सभ्यता शिकवतात. तुम्ही खरोखर कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात ते तुम्हीच ठरवा. जिथे माझा प्रश्न आहे तिथे मी माफी मागतो.
View this post on Instagram