बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीडच्या कारागृहात कैद आहे. मात्र, कारागृहात असून कराड गँगचा माज उतरला नसल्याचा दिसून येते आहे. कारागृहातमध्ये कराड गँग आणि गित्ते गँगमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त होते. आत्ता ज्याच्यावर हाणामारी करण्याचा आरोप होता त्या महादेव गित्तेच्या पत्नीने वाल्मिक कराडवर खबळबळजनक आरोप केला आहे.
मीरा गित्ते म्हणाल्या की, ‘कारागृहात माझा पती महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा आरोप खोटा आहे. उलट वाल्मिक कराडच्या माणसाने माझ्या पतीला मारहाण केली. वाल्मिक कराडने माझ्या पतीला धमकी दिली आम्ही आणि तू कारागृहात आहोत म्हणून तू जिवंत आहेस नाहीतर संतोष देशमुखचे जेवढे हाल केले नाहीत त्यापेक्षा जास्त तुझे हाल हाल करून मारलं असतं.’

मीरा गित्ते यांनी कारागृह प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते फक्त वाल्मिक कराडच्या आदेशाने काम करतात. मी कारागृहात झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फूटेज मागितले होते. मात्र, ते मला दिले नाही. वाल्मिक कराड याला दुसऱ्या कारागृहात हलवायचे सोडून माझ्या पतीला आणि अक्षय आठवलेला दुसऱ्या कारागृहात पाठवले आहे. वाल्मिकला बीडच्या कारागृहात सगळ्या सुखसुविधा मिळत असल्याचा आरोप देखील मीरा गित्ते यांनी केला आहे.
कारागृह प्रशासनाचा दावा काय?
वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यात मारहाण झाल्याचा दावा खोटा असल्याचे बीड कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दुसऱ्या दोन कैद्यांमध्ये बाचाबाची झाली त्यावेळी सगळे कैदी तेथे आले त्यामुळे गोंधळ उडाला. मात्र, यामध्ये वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांना मारहाण झालेली नाही.
तीन दिवसांपासून प्लॅनिंग
मीरा गित्ते यांनी कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप करत तीन दिवसांपासून महादेव गित्ते यांना मारण्याची प्लॅनिंग कारागृहातच सुरू असल्याचा म्हटले आहे. तसेच वाल्मिक कराडचे साथीदार संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी विलास गिते, रघु फड, सुदीप सोनवणे यांनी आपल्या पती महादेव गित्ते यांच्यावर कारागृह प्रशासनाने सीसीटीव्ही फूटेज दिले तर सगळेच स्पष्ट होईल, असे देखील मीरा गित्ते म्हणाल्या.