विशाल गवळीची अक्षय शिंदेप्रमाणे हत्याच, वकिलांचा दावा, हत्या की आत्महत्या?

विशाल गवळी याने आत्महत्या केली नसून, हत्याच केल्याचा दावा विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केलाय

मुंबई – कल्याणमधील तेरा वर्षे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर या घटनेनंतर महाराष्ट्रतून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. या चिमुरडीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र हळहळला होता. याच प्रकरणात आता एक अपडेट समोर आली आहे. या घटनेतील आरोपी विशाल गवळी याने आज पहाटे तळोजा तुरुंगात बाथरूममध्ये टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र त्याच्या या आत्महत्यानंतर ही आत्महत्या नसून, हत्याच असल्याचं विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी दावा केला आहे.

अक्षय शिंदेप्रमाणेच विशालचीही हत्या…

दरम्यान, बदलापूर घटनेत चिमुरडीवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे या आरोपीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले. त्याचप्रमाणे विशाल गवळीची ही आत्महत्या नसून, पोलीस यंत्रणांनी त्याला मारले असल्याचा गंभीर आरोप विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केला आहे. मी विशालच्या सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात यावी, असा मी अर्ज न्यायालयात केला होता. परंतु त्याला कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे विशालची ही आत्महत्या नसून हत्याच करण्यात आली असल्याचा संशय विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी व्यक्त केला आहे.

आम्हाला न्याय मिळाला…

बदलापूरचे प्रकरण ताजे असताना कल्याणमधील घटनेमुळेही मन हे हेलावून गेले होते. कल्याणमधील आरोपीला पोलिसांनी  कल्याण बाहेर जाऊन त्याच्या मुस्क्या आवलल्या होत्या. यानंतर त्याची तळोजातील तुरगात रवानगी करण्यात आली होती. मात्र विशाल गवळीच्या मृत्यूनंतर मृत्य मुलीच्या वडिलांनी आमच्या मुलीला न्याय मिळाला… अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे विशाल गवळीला फाशी द्या, यासाठी महिलांनी रस्त्यावर आंदोलन केलं होतं. या घटनेनंतर कल्याणमध्ये लोकांनी होर्डिंग्स लावून आरोपी फाशीची मागणी केली होती. परंतु आरोपीला फाशी होणार होती हे माहित होतं. म्हणून त्याने आत्महत्या केली. ही बातमी ऐकून आम्हाला न्याय मिळाला. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली आहे. आरोपीने स्वतःहून फाशी लावून घेतली हे चांगलं झालं असंही सुलभा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News