BMW-Mercedes कारपेक्षाही महाग असलेली ‘हसरी’ पाल, बॅगेत घेऊन फिरत होते दोघे जण; अखेर…

या हसऱ्या पालीला काळ्या बाजारपेठेत मोठी मागणी असते.

Rare Lizards Seized In Assam : आसामच्या डिब्रुगढ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक विशिष्ट प्रजातीच्या पालीची तस्करी केली जात होती. तिला बँगेत भरून दुसरीकडे घेऊन जात असताना पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं. त्यांची बँग तपासल्यानंतर पोलिसांना धक्काच बसला.

आसामच्या डिब्रुगढ जिल्ह्यात पोलिसांना शुक्रवारी एक मोठं यश मिळालं आहे. टोकई गेक्को (Tokay gecko) पालींची तस्करी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी एकूण 11 दुर्मीळ टोकई गेक्को पाली ताब्यात घेतल्या आहेत आणि तीन तस्कऱ्यांना अटक केली आहे.

60 लाखंमध्ये विकण्याचा होता प्लान…

या आरोपींमध्ये देबाशीष डोहुटिया (Debashis Dohutia) (34), मानश डोहुटिया (Manash Dohutia) (28) आणि दीपंकर घरफलिया (Dipankar Gharphalia) (40) यांचा समावेश आहे. हे आरोपी अरुणाचल प्रदेशातील या पाली आणून डिब्रूगढमध्ये विकण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या एका पालीची किंमत 60 लाखांपर्यंत लावण्यात आली होती. तस्करांकडून ही पाल काळ्या बाजारात विकण्याचा प्लान होता.

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत टोकई गेक्को पालींचा संरक्षित आणि अत्यंत धोकादायक प्रजातींमध्ये समावेश केला गेला आहे. या पालीची शिकार किंवा तस्करी पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. या पालीचा चेहरा हसरा आहे. मात्र या हसऱ्या पालीला काळ्या बाजारपेठेत मोठी मागणी असते.

तिघांना अटक…

आसाम पोलिसांच्या स्पेशन टास्क फोर्सला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. डिब्रुगढच्या मोहानवाडी भागात या पालींची तस्करी होणार होती. गुप्त माहिती मिळताच एसटीएफच्या टीमने जिल्हा पोलीस आणि दक्षिण आशिया कार्यालयाच्या वन्यजीव न्याय आयोगाच्या मदतीने एक ऑपरेशन सुरू केलं.


सद्यस्थितीत एसटीएफ टीमने तातडीने कारवाई करीत तिघांना अटक केली. पोलिसांना त्यांच्या बॅगेतून 11 दुर्मीळ टोकई गेक्को पाली सापडल्या. या तस्करीच्या मागे दक्षिण पूर्व आशियाई देशांतील काळ्या बाजारात याची मोठी मागणी आहे. या पालींचा उपयोग पांरपरिक औषधं आणि तंत्र-मंत्रसाठी केला जातो.


About Author

Smita Gangurde

Other Latest News