Walmik Karad : ‘वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करायचा होता, पण…’

बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

बीड: बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड नाव अवघ्या महाराष्ट्रात पोहोचलं. वाढत्या दबावानंतर वाल्मिक कराड तुरूंगात पोहोचला. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पहायला मिळालं. याच दरम्यान आता बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे.

‘कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न…’

वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न मंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची अनेक गुपित माहित होती. त्यामुळे ते खुनाच्या आरोपात सहरोपी झाले असते, असा दावा वादग्रस्त निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला आहे. नव्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडीओमध्ये रणजीत कासले यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. रणजित कासलेंच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

“धनंजय मुंडे पुरावे समोर आल्यानंतर संतोष देशमुखांच्या प्रकरणात सह आरोपी झाले असते, मात्र फडणवीसांच्या पाठिंब्यामुळे ते वाचले” रणजित कासलेंनी केलेल्या या विधानामुळे देखील मोठी खळबळ उडाली आहे. या खळबळजनक आरोपांनंतर महाराष्ट्र पोलीस आपला शोध घेतील असं कासलेंना वाटल्याने पोलिसांनी मला पकडून दाखवावे, असं आव्हान देखील रणजीत कासले यांनी दिले आहे. आपला कोणत्याही समाजाला दुखावण्याचा हेतू नाही बोलायचं ओघात काही आक्षेपार्ह विधान झाले मी माफी मागतो, असंही स्पष्टीकरणही रणजीत कासले यांनी अॅट्रोसिटी गुन्ह्या  संदर्भात दिले.

कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती…-कासले

वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मला देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा देखील रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी  50 कोटींची ऑफर दिल्याचं रणजीत कासले म्हणाले. रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत. या कासलेंनी केलेला कराडच्या एन्काऊंटरचा दावा धक्कादायक मानला जात आहे. या प्रकरणात आणखी तपास होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News