Salman Khan: सलमान खानचा नवीन दुश्मन आला समोर; गुजरातमधून आली होती धमकी!

सलमान खानला काल पुन्हा धमकीचा मेसेज आला होता, आता अखेर सलमानचा नवा दुश्मम समोर आला आहे. गुजरातमधील...

मुंबई: लॉरेन्स बिष्णोई धमकी प्रकरण, गॅलक्सी अपार्टमेंटमधील गोळीबाराचं प्रकरण ताजं असताना सलमान खानला काल पुन्हा धमकीचा मेसेज आला होता. अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या आरोपीची ओळख देखील पटली आहे. गुजरातमधील मानसिक रुग्णाने वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज पाठवला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे.

काल आली होती धमकी:

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीबाबतचा मेसेज वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यानंतर याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी अधिक तपास केला असता एका मानसिक रुग्णाने हा धमकीचा मेसेज पाठवल्याचं समोर आलं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधील मानसिक रुग्णाला ताब्यात घेतलं आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आत वरळी पोलिसांनी धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याची ओळख पटवून दिली.

आरोपी मयंक पांड्या मानसिक रूग्ण

या प्रकरणातील आरोपीचे नाव मयंक पांड्या असून त्याचे वय 25 आहे. संबंधित आरोपी  हा गुजरातमधील बडोदा इथला रहिवासी आहे. पोलिसांनी तांत्रिक यंत्रणेचा वापर करून पांड्याला त्याच्या वडोदरा इथल्या निवासस्थानी शोधून काढलं. अधिक चौकशी केली असता असे लक्षात आले की,  तो मानसिक आजारावर उपचार घेत आहे. पोलिसांनी त्याला नोटीस बजावली असून आगामी काळात चौकशीला सामोरे जाण्यास सांगितले आहे.

आरोपीला स्थानिक व्हॉट्स ॲप ग्रुपवर सलमान खान आणि गुंड लॉरेन्स बिष्णोई यांच्या वादाबद्दल माहिती मिळाली होती. तसंच वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यापूर्वीही धमकी आल्याचं समजलं होतं. त्यातून त्याने हा प्रकार केल्याचं सांगितलं आहे. तरुणाविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. मयंक पांड्याला तीन दिवसांत पोलिसांसमोर हजर राहून त्याची बाजू मांडावी लागेल.

सलमानला धमक्याचं सत्र

याआधीही सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप नंबरवर धमकीचा मेसेज आला होता आणि आरोपीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. दोन कोटी रुपये न दिल्यास सलमानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. हे धमकीचे सत्र थांबवणे हे पोलिसांसमोरचे आव्हान आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News