बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडची दहशत अजूनही संपली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे बीड विभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांनीच आपल्या जबाबामध्ये वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांची अजूनही बाहेर दहशत असल्याची कबूली दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात IPS बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या एसआयटीच्या समोर बीडचे डीवायएसपी विश्वंभर गोल्डे यांनी आपला जबाब दिला आहे. या जबाबामध्ये वाल्मिक कराडची बीडमध्ये दहशत होती याची कबुली दिली. तसेच तो तुरुंगात असतानाही त्याचे कार्यकर्त्यांची अजूनही दहशत आहे.

संतोष देशमुख यांची हत्या
9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. आवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी विरोध केल्याने त्यांची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला वाल्मिक कराड याच्यावर खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल झाला होता मात्र चौकशीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येत तोच मुख्य आरोप असल्याचे समोर आले. दोषारोपत्रात त्याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण?
करुण शर्मा यांनी दावा केला की वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण झाली. तुरुंगातील त्याची दहशत संपली आहे. मी बीडमध्ये आल्यानंतर शपथ घेतली होती की वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांची दहशत संपवेल. माझी शपथ मी पूर्ण केली आहे, असे करुणा यांनी म्हटले तसेच त्यांनी लवकरच आपण तुरुंगात वाल्मिक कराड याला भेटण्यासाठी जाणार असल्याचे देखील सांगितले.