गुगल मॅपने दिला धोका, तरूण गाडीसह थेट रेल्वे रूळावर…नेमकं काय घडलं?

गुगल मॅप कधी कधी धोका देते याचा अनुभव सर्वांनाच आहे, आता अशीच एक घटना समोर आली आहे. यामध्ये मॅपने गंडवल्याने तरूण गाडी घेऊन थेट रेल्वे रूळावर पोहो्चला...

गोरखपूर, उत्तरप्रदेश: गोरखपूरमधील एका पार्टीतून परतताना बिहारच्या गोपालगंज येथील एका व्यक्तीने गुगल मॅपचा आधार घेतल्याने त्याला गंभीर त्रासाला
सामोर जावं लागलं. तो माणूस मृत्यू होण्यापासून अगदी थोडक्यात बचावला. गुगल मॅपकडून फसवलं गेल्याने अथवा मॅप न कळल्यामुळे अशा घटना सातत्याने घडत असतात. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचे अनेक प्रसंग यापूर्वी समोर आले आहेत. 2024 मध्ये गुगल मॅपमुळे झालेल्या अपघातांची संख्या मोठी
होती.अर्धवट काम झालेल्या पुलावरून गाडी नदी पडली होती. तर कधी गाडी गर्द जंगलात पोहोचली, अशा अनेक घटना या आधी देखी समोर आलेल्या आहेत. गुगल मॅपमुळे बाईकस्वार खांबाला धडकून त्याचा मृत्यू झाल्याची घटना देखील मागील वर्षी समोर आली होती.

नेमकं काय घडलं?

संबंधित व्यक्ती उत्तरप्रदेशमधून बिहारमधील त्याच्या गावाकडे जात होता. दरम्यान लखनऊ भागातील ढेमिन गढजवळ ही घटना घडल्याचं समोर येत आहे. हा व्यक्ती मॅप बघत रेल्वे ट्रॅकच्या बाजूने गाडी चालवत होता. इतक्यात एक मालगाडी त्याच्या दिशेने येऊ लागली. सुदैवाने लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्या व्यक्तीची गाडी रूळाजवळील खडकात अडकली असता लोको पायलटने ब्रेक दाबला, गाडीपासून फक्त 5 मीटर अंतरावर ट्रेन थांबली आणि संबंधित व्यक्ती बचावला. मोठी दुर्घटना टळली.

तो कारचालक मद्यधुंद?

संबंधित कारचालकाचे नाव आदर्श राय असे असून तो गोपाळगंज येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे.त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार
तो एका पार्टीला गेला होता, आणि रात्री उशिरा घराकडे परतत होता.त्याने गुगल मॅपवर त्याच्या गावाचे नाव टाकत अर्धवट पत्ता टाकला, आणि त्यामुळे तो रस्ता चुकला, रेल्वे सुरक्षा पोलिसांनी घटनास्थळी जात गाडी ट्रॅकवरून हटवून रस्ता तात्काळ मोकळा करून दिला. यामुळे काही प्रमाणात रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. सुदैवाने त्या वेळी त्या ठिकाणी कोणत्याही इतर ट्रेन न आल्याने मोठा अनर्थ टळला. तो कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता, असं पोलिसांनी दिलेल्या माहितीतून समोर आलं आहे. पोलिस त्या व्यक्तीची अधिक चौकशी करत आहेत.

 

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News