Terror Attack Jammu kashmir: जम्मूच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती

जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाय, यामध्ये काही जवानांसह पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे...

पहलगाम, जम्मू: जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही जवानांसह 27 हून अधिक पर्यटक मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदींनी, गृहखात्याने घेतली दखल

ही घटना अत्यंत धक्कादायक मानली जात असून या घटनेची पंतप्रधान मोदींसह भारताच्या गृहखात्याने गंभीर दखल घेतली आहे. गृहमंत्री अमित शाह ग्राऊंड झिरोवर जात या घटनेवर लक्ष ठेवणार आहेत.

 

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्याची माहिती समोर येत आहे. पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.

या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, हा मोठा धक्का मानला जात आहे.

धर्म विचारला अन् गोळ्या झाडल्या…

पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे. परिणामी या घटनेची पंतप्रधान मोदींनी स्वत: दखल घेतली आहे, हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाला असल्याची प्रतिक्रीया आता येत आहे,

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News