असे म्हटले जाते की आपल्या दिवसाची सुरूवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. सकाळी उठल्याबरोबर काही कामे करू नयेत, कारण जर दिवसाची सुरुवात वाईट झाली तर संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की काही कामे अशी आहेत की या गोष्टी केल्यास आयुष्यात नकारात्मक उर्जा वाढते. चला तर मग जाणून घेऊया, वास्तुशास्त्रानुसार सकाळी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे ते…
बंद घड्याळ
सकाळी उठताच जर तुम्हाला बंद घड्याळ दिसलं तर हा शुभ संकेत मानला जात नाही. वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठताच बंद घड्याळ पाहिल्याने तुमची कामे रखडू शकतात. त्यामुळे जर तुमच्या घरी घड्याळ बंद पडले असेल तर ते आधी दुरुस्त करुन घ्या.

आरसा
काही लोकांना सकाळी उठताच आरसा बघायची सवय असते. पण, वास्तूशास्त्रानुसार, असं करणं अशुभ आहे. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी पाहू नका
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उष्टी, खरकटी भांडी पाहू नयेत. सकाळी उष्टी खरकटी भांडी पाहणे शुभ मानले जात नाही. रात्री झोपण्यापूर्वी खरकटी भांडी धुवावीत. रात्री खरकटी भांडी घरात तशीच ठेवल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात.
सकाळी उठल्यावर सावली पाहू नका
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आपली किंवा दुसऱ्याची सावली पाहू नये. जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सूर्य पाहण्यासाठी बाहेर पडलात आणि पश्चिमेला आलात आणि सूर्य पूर्वेकडून उगवताना तुमची सावली पाहिली तर त्यामुळे वास्तूनुसार ते योग्य मानले जात नाही. वास्तूनुसार हे राहूचे लक्षण असल्याचे सांगितले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )