महिलांचा उजवा डोळा फडफडणे चांगले की वाईट? काय सांगते समुद्रशास्त्र

अनेकदा आपला डोळा फडफडतो. काहीजण डोळा फडफडणे शुभ संकेत मानतात तर काहीजण अशुभ मानतात. पण महिलांचा उजवा डोळा फडफडण्याचा अर्थ काय आणि हे कसले संकेत असतात? जाणून घ्या

साधारणपणे डोळे फडफडणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. पण समुद्रशास्त्रात या घटनेमागे वेगळेच संकेत असल्याचं बोललं जातं. समुद्रशास्त्रानुसार, डोळा फडफडणे हे येणाऱ्या काळाचे संकेत देतात. शास्त्रानुसार, शरीराचे अवयव आपल्याला बरेच काही सांगतात. त्याचप्रमाणे, डोळे फडफडणे देखील यापैकी एक आहे. दोन्ही डोळे वेगवेगळ्या वेळा दर्शवतात. महिलांचा उजवा डोळा फडफडणे शुभ आहे की अशुभ जाणून घेऊया.

महिलांचा उजवा डोळा फडफडणे

समुद्रशास्त्रानुसार, महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात काहीतरी वाईट घडण्याची शक्यता असते. महिलांचा उजवा डोळा फडफडणे हे वाईट संकेत असतात. कठीण काळ, भांडण किंवा संघर्षाचे हे लक्षण असू शकते अशी अनेकांची मान्यता आहे. मानसिक ताण आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. असे मानले जाते की यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये भांडणे होऊ शकतात. तुमचे काम अडकू शकते किंवा अपूर्ण राहू शकते. समुद्रशास्त्रानुसार, जर एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडला, तर ते अनेक अडचणी आणि संकटांचे संकेत मानले जाते. असे मानले जाते की, भविष्यात काही वाईट घटना घडू शकतात किंवा कामात अडथळे येऊ शकतात.

अशा परिस्थितीत काय करावे?

डोळ्यांवर थोडे गंगाजल शिंपडू शकता आणि देवाची प्रार्थना करू शकता. हनुमानजींचे स्मरण करणे आणि हनुमान चालीसा पाठ करणे. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच, तुम्ही एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न दान करू शकता. तुळशीची पाने चघळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरामध्ये सुगंधित धूप किंवा दिवा लावा. नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक विचार करा. जास्त चिंता करू नका आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News