सात पांढऱ्या घोड्यांचा फोटो घरात का लावावा? काय सांगतं वास्तुशास्त्र?

सात पांढऱ्या घोड्यांचं चित्र घरात कोणत्या दिशेला लावावं, याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? जाणून घेऊया...

वास्तुशास्त्रानुसार, घरात घोड्याचं चित्र असल्यास जीवनात सुख, समृद्धी येते आणि आर्थिक भरभराट होते. अनेकांच्या घरात सात धावत्या घोड्यांचे चित्र पाहिले असेल. यामागचे कारणही तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. वास्तुशास्त्रानुसार, धावणाऱ्या घोड्यांचे चित्र जितके सुंदर दिसते, तितकेच ते लावल्याने माणसाचे नशीब उजळू शकते. अर्थात, सात पांढऱ्या घोड्यांचं चित्र योग्य दिशेनं लावणं आवश्यक आहे. सात पांढऱ्या घोड्यांचं चित्र घरात कोणत्या दिशेला लावावं, याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते? सात पांढऱ्या घोड्यांच्या चित्राचं महत्त्व काय? याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

कोणत्या दिशेला असावा फोटो

वास्तुनुसार कामाच्या ठिकाणी तसेच घरामध्ये सात धावणाऱ्या घोड्यांचे चित्र पूर्व दिशेला लावल्यास तुमच्या कामकाजावर याचा चांगला परिणाम होतो. आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते. वास्तूनुसार सात पांढऱ्या धावत्या घोड्यांचं चित्र घरात लावल्यानं देवी लक्ष्मी प्राप्त होते. हे चित्र लावल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा संपून घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. धावत्या घोड्यांचं चित्र हे वेगाचं, शक्तीचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे.

सात धावत्या घोड्याचे चित्र लावण्या चे फायदे

वास्तुशास्त्रानुसार घोडा हे प्रगतीचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे घरातील घोड्याचे चित्र जर नेहमी तुमच्या दृष्टीस पडले तर मानसिक रित्या तुमची कार्यशैली वाढण्यास मदत होते. पांढऱ्या रंगाचा घोडा हा वास्तुशास्त्रानुसार उर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, म्हणून घरी किंवा ऑफिसमध्ये पांढर्‍या घोडाचे चित्र लावा. धावणाऱ्या घोड्यांचे चित्र जितके सुंदर दिसते, तितकेच ते लावल्याने माणसाचे नशीब उजळू शकते. वास्तुनुसार सात पांढरे घोडे शांततेने वास्तू चालवतात आणि ते समृद्धी आणि सौभाग्य आणू शकतात. तसेच तुमच्या कामकाजावर याचा चांगला परिणाम होतो. आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते. आपण सतत काय पाहतो, काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते. म्हणून धावत्या घोड्यांचे छायाचित्र आपल्याला नेहमी उत्साह, जोश आणि ऊर्जा देत राहील, त्यामुळे आळस झटकून कामाचा वेग वाढेल आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News