कोण आहे लाफिंग बुद्धा? ज्यांना मानलं जातं समृद्धीचं प्रतीक…

जाणून घ्या कोण होते लाफिंग बुद्धा?

लाफिंग बुद्धाची मूर्ती अनेकांच्या घरात ठेवल्याचे तुम्ही पाहिले असेल. ऐवढेच काय तर आपण देखील अनेकांना लाफिंग बुद्धाची मूर्ती गिफ्ट म्हणून देतो. असे म्हणतात की कोणालाही लाफिंग बुद्धाची मूर्ती दिल्याने किंवा ती घरात ठेवल्याने घरी संपत्ती आणि ऐश्वर्य नांदते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की हे लाफिंग बुद्ध नक्की आहे तरी कोण आणि या मूर्तीचा प्रगती, समृद्धी इत्यादींशी काय संबंध आहे? चला तर मग जाणून घेऊया माहिती…

लाफिंग बुद्ध हे जपानचे होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक शिष्यांपैकी ते एक होते. असे म्हणतात की त्यांना आत्मज्ञान प्राप्त होताच ते हसायला लागले. ते गावोगावी जाऊन एकमेकांना हसवायचे आणि गावकरी त्याच्यावर खूप खुश होते. हसणे ही त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांना लाफिंग बुद्ध हे नाव देण्यात आलं.

लाफिंग बुद्धांचा इतिहास

लाफिंग बुद्धा हे बुद्धांचे जपानी शिष्य असल्याचे मानले जाते. त्याचे खरे नाव होतेई होते. जेव्हा ते लोकांमध्ये असायचा तेव्हा पोट दाखवून जोरजोरात हसायचे आणि वातावरण प्रसन्न करत असे. जेव्हा त्यांना बुद्धांकडून शिकवण प्राप्त केली, तेव्हा ते अचानक मोठ्याने हसायला लागले आणि पुढे त्यांनी ते जिथेही असतील तिथल्या लोकांना हसवणे हे त्यांचे जीवन ध्येय बनवले. होतेई यांचे शरीर गुबगुबीत होते आणि त्यांना पोट होते. त्याच्या आनंदी स्वभावामुळे लोक त्याला लाफिंग बुद्धा असं म्हणू लागले. ते जिथे जायचे तिथे लोकांना इतकं हसवायचे की तिथली नकारात्मकता पूर्णपणे नाहीशी व्हायची. होतेई यांना चीनमध्ये पुटाई म्हणून ओळखले जाते आणि फेंगशुईचा देव मानला जाते. असे मानले जाते की ज्या घरात लाफिंग बुद्धांची मूर्ती असते त्या घरात सुख-समृद्धी असते आणि नकारात्मकता दूर होते.

लाफिंग बुद्धा त्यांची मूर्ती इतकी शुभ का मानली जाते?

वास्तू शास्त्रात लाफिंग बुद्धाला सुख-संपत्ती आणि प्रगतीचं प्रतीक मानले जाते. त्यामुळे याला घरात ठेवल्यामुळे आर्थिक संपन्नता आणि सकारात्मकता येते. तुम्ही लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात, कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी ठेऊ शकता. घरात लाफिंग बुद्धाच्या हसणाऱ्या मूर्तीला आनंद, सुख आणि समृद्धिचं प्रतीक मानलेलं आहे. लाफिंग बुद्धाचे पोट मोठे असते. असं म्हणतात की, त्या मूर्तीतील लाफिंग बुद्धाचे मोठे पोट संपन्नतेचं प्रतीक आहे. त्यामुळे या मूर्तीला घराच्या मुख्य दारासमोर ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच हातात किंवा पाठीवर धनाची पोटली घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती चांगली मानली जाते. वास्तू शास्त्रानुसार बेडरूम आणि स्वयंपाक घरात लाफिंग बुद्धाचा फोटो किंवा मूर्ती ठेऊ नये. कारण यामुळे घरात नकारात्मकता येते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News