घरात आरसा असणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार आरसा ठेवला तर तुम्हाला त्याचे बरेच फायदे मिळू शकतात. वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व आहे. म्हणून, घरात आरसा लावण्यापूर्वी, योग्य दिशा जाणून घेणे महत्वाचे आहे. घरातील वास्तुदोषांमुळे कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी पटत नाही, कुटुंबात दररोज भांडणे होतात आणि घरातील लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊया की घराच्या कोणत्या दिशेला आरसा लावणे योग्य मानले जाते.
‘या’ दिशांना लावू नका आरसा
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कधीही आरसा ठेवू नये कारण त्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरात कधीही आरसा दक्षिणआणि पश्चिम दिशेला लावू नये. कारण या दिशांना आरसा लावणे अजिबात शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, आरसा कधीही बेडरूमध्ये ठेवू नये. कारण जर तुम्ही या ठिकाणी आरसा ठेवला तर घरातील सदस्यांमध्ये मतभेद आणि तणाव वाढू लागतो.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोणत्या दिशेला आरसा लावाल
वास्तुशास्त्रानुसार आरसा लावण्यासाठी उत्तरेकडील भिंत सर्वोत्तम मानली जा र तुम्हाला आपल्या घरात आरसा लावायचा असेल तर तो उत्तर-पश्चिम, दक्षिण-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम दिशेला लावावा. आरसा अशा प्रकारे लावावा की त्याकडे पाहताना तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल.
वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेला आरसा ठेवू नये, अन्यथा वास्तुदोष होण्याची भीती असते. त्यामुळे घरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागते. म्हणून, जर घरात तुटलेला आरसा असेल तर तो ताबडतोब काढून टाकावा, अन्यथा त्यातून नकारात्मक ऊर्जा वाढू लागते.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)