राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर सात IPS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, IPS अधिकारी कोण?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या बदलांचा धडाका मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नुकतेच गेल्या आठवड्यात 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

IPS TRANSFER – नुकतेच गेल्या आठवड्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. यानंतर आता राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात बदली केली जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात खांदेपालट होताना दिसत आहे. पाहूया कोणाची कोणत्या ठिकाणी वर्णी लागली आहे.

कुणाची बदली कुठे? अधिकारी कोण?

दरम्यान, सात आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये शारदा निकम यांची बदली आता अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. तर अभिषेक त्रिमुखे प्रशासन विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आलेय. तिसरे अधिकारी राजीव जैन यांची सागरी सुरक्षा विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आलेय.

नागपूर शहराचे पोलीस सहआयुक्त निसार तांबोळी यांची बदली राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षकपदी झाली आहे. रेल्वेत कार्यरत असणारे रविंद्र शिसवे यांची बदली आता राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. सुप्रिया पाटील-यादव यांची बदली आता विशेष आस्थापना विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. तर एन डी. रेड्डी. यांची बदली नागपूर शहराच्या सहआयुक्तपदी येथे झाली आहे.

महायुतीच्या काळात मोठी खांदेपालट…

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने मोठा कौल दिला. यानंतर सरकार डिसेंबर महिन्यात महायुतीच्या सरकारची स्थापन झाली. डिसेंबर महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या बदलांचा धडाका मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नुकतेच गेल्या आठवड्यात 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आली होती.

.यानंतर आता सात आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या गृह विभागाने घेतला असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे महायुतीचे सरकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये आणि खांदेपालट होताना दिसत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News