घरातील नळातून पाणी गळणे हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रात नळातून पाणी गळल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, असे सांगितले जाते. त्यामुळे नळातून पाणी गळत असल्यास त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्राच्या मते यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. जर तुमच्या घरातही असे होत असेल तर ते नळ वेळीच दुरुस्त करा. नळातून गळणारं पाणी वास्तूच्या दृष्टीने अशुभ मानले जाते. त्याचा माणसाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो.
स्वयंपाक घरात पाण्याचा नळ गळत असल्यास काय होते?
तुमच्या स्वयंपाक घरातील नळ जर गळत असेल तर याचा फटका तुमच्या आर्थिक स्थितीला बसताना दिसतो. स्वयंपाक घरातला नळ गळणे अशुभ मानले जाते. स्वयंपाक घरात अग्निदेवता असते. जेव्हा पाणी आणि अग्नि दोन्ही एकत्र येतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊन तुमच्या जवळील पैसा पाण्यासारखाच वाहू लागतो. तुम्ही कितीही पैसे कमावले तरी ते टिकत नाहीत असे वास्तुशास्त्र सांगते.

घरात समस्या निर्माण होतात
घरात विनाकारण पाणी वाहत असेल तर घरात दोष निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहते. त्यामुळे संकट उभे राहू शकतात. वास्तूशास्त्रानुसार नळातून पाणी गळणं किंवा टपकणं हे चांगलं नाही. त्यामुळे घरावर संकट ओढवू शकतं, व्यवसायात मोठा तोटा होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याचे हे संकेत असतात. त्यामुळे तुमच्या नळातून पाणी टपकत असेल किंवा गळती लागली असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करणे चांगले.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )