घरात ‘या’ पक्ष्यांचे आगमन देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देते, जाणून घ्या

घरात लक्ष्मीचे आगमण होण्याआधी मिळतात 'हे' संकेत जाणून घ्या

हिंदू धर्मात झाडे, वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांची पूजा केली जाते. यांना देवाचे रूप देखील मानले जाते. असे मानले जाते की काही प्राणी आणि पक्षी वास्तविक जीवनात आनंद, समृद्धी आणि संपत्ती दर्शवतात. धार्मिक शास्त्रांमध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. घरात काही विशिष्ट पक्ष्यांचे आगमन हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत मानले जाते, असे वास्तुशास्त्र सांगते. या पक्ष्यांचा संबंध लक्ष्मीच्या कृपा आणि आर्थिक समृद्धीशी जोडला जातो. त्यामुळे, जर तुमच्या घरात काही खास पक्षी आले, तर ते शुभ संकेत मानले जातात आणि त्यामुळे तुमचं नशीब देखील चांगले होऊ शकतं. घरात कोणाचे आगमन खूप शुभ मानले जाणून घेऊया…

घुबड

वास्तुशास्त्रानुसार घुबडाला संपत्तीचे प्रतीक मानले जाते. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला घुबड दिसले तर याचा अर्थ असा की तुमच्यासोबत लवकरच काहीतरी शुभ घडणार आहे. वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्याला कुठूनतरी घुबड येताना किंवा जाताना दिसले तर ते शुभ लक्षण मानले जाते. हे असे संकेत आहे की येणाऱ्या काळात तुमच्या घरात लवकरच सुख-समृद्धी येणार आहे.

पोपट

घरात पोपटाचे आगमन हे शुभ लक्षण मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार याला आर्थिक समृद्धी, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनात सकारात्मकता येते.  वास्तुशास्त्रानुसार पोपट हा संपत्तीचे प्रतीक मानला जातो.

कावळा

वास्तुशास्त्रानुसार, कावळ्याचे आगमन घरासाठी शुभ असते. पाहुण्यांच्या आगमनाची सूचना देण्यासाठी कावळे घरात येतात अशी एक मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार कावळा घरामध्ये येणे हे अनेक शुभ घटनांचे संकेत असू शकते. कावळ्याच्या आगमनामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे घरात समृद्धी आणि सुख-शांती टिकून राहते. 

नीलकंठ

नीलकंठ पक्षी जो वैष्णव धर्मात गरुड पक्षी म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात या पक्ष्याला भगवान विष्णू किंवा भगवान नारायण यांचे वाहन मानले जाते, ज्यांना सर्व देवी-देवतांचे रक्षक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार नीलकंठाचे आगमन हे एक चांगले लक्षण मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, नीलकंठ हे शुभ आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतात, तसेच ते घरामध्ये समृद्धी आणि शांती आणतात अशी मान्यता आहे. नीलकंठ पक्षी शुभ मानले जातात आणि त्यांच्या आगमनाने घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धी येते, असे वास्तुशास्त्र सांगते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News