रामनवमीच्या उत्सवात साईंच्या झोळीत भरभरुन दान, 3 दिवसांत नोटांची भिंत झाली तयार

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रामनवमीला साईंच्या चरणी केल्या जाणाऱ्या दानात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शिर्डी : साईबाबा संस्थानच्या वतीनं शिर्डीत साजरा करण्यात येत असलेल्या रामनवमीच्या उत्सवाला यावर्षीही प्रचंड प्रतिसाद मिळाला. तीन दिवसांच्या या उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबा मंदिरात येऊन दर्शन घेतलं आणि रामनवमीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. या तीन दिवसांत भाविकांनी साईंच्या दानपेटीत भरभरुन दान टाकलंय.

गेल्या वर्षाच्या तुलनेत 50 लाखांनी वाढलं दान

रामनवमीच्या तीन दिवसांच्या काळात तब्बल 4 कोटी 26 लाख रुपयांचं दान साईंच्या दानपेटीत जमा झालंय. गेल्या वर्षाच्या तुलनेत दान 50 लाखांनी वाढलेलं आहे. साईबाबा संस्थानच्या वतीनं 114 वा श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात शिर्डीत पार पडला. या 3 दिवसांच्या काळात राज्य, देश आणि परदेशातून सुमारे अडीच लाख भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय. भाविकांनी साईबाबांना भरभरून दानही केलंय.

साई मंदिरात आलेलं दान

1. साईबाबा मंदिरातील देणगी काऊंटरवर 79 लाख 38 हजार 830 रुपये देणगी
2. व्हीआयपी पासेसच्या माध्यमातून 47 लाख 16 हजार 800 रुपये
3. मंदिर परिसरातील दक्षिणा पेटीत 1 कोटी 67 लाख रुपये4. ऑनलाईन देणगी , चेक, डीडी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी 24 लाख 15 हजार रूपये
5. सोन्याचे दागिने 83 ग्रॅम, 6 लाख 15 हजार 782 रुपये
6. चांदी 2030 ग्रॅम,1 लाख 31 हजार 478 रुपये
7. पाच देशांतून विदेशी चलनही देणगी रुपात

गेल्या वर्षी रामनवमी उत्सवाच्या 3 दिवसांत 3 कोटी 89 लाख रुपय भाविकांनी दान केले होते. यंदाच्या रामनवमी उत्सवाच्या 3 दिवसांत 4 कोटी 26 लाख रुपये दान स्वरूपात दिलेत


About Author

Smita Gangurde

Other Latest News