टोकीयो: जपानी बाबा वेंगाने केलेले प्रत्येक भाकीत हे आजवर खरे ठरले आहे. आता जुलै 2025मध्ये प्रलय येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे आता उत्सुकतेसोबत भिती देखील वाढली आहे, बाबा वेंगांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊ
जुलै 2025 मध्ये मोठी आपत्ती?
बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांच्या भविष्यवाण्या नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करतात. त्यांच्या अनेक भयावह गोष्टी प्रत्यक्षातही आल्या आहेत. जपानी बाबा वेंगाने आता आणखी एक भविष्यवाणी केली आहे. ‘जपानचे बाबा वांगा’ म्हणून ओळखले जाणारे रियो तात्सुकी यांनी इशारा दिला आहे की जुलै 2025 मध्ये जगावर एक मोठी आपत्ती येऊ शकते, जी आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक संकटांपैकी एक असेल. त्यांची मागील अनेक भाकीते खरी ठरली आहेत.

2025 आपत्तीजनक वर्ष राहणार, वेंगांचा दावा
भाकितानुसार, जुलै 2025 मध्ये जपानला अतिशय विनाशकारी त्सुनामी येऊ शकते, जी 2011 च्या त्सुनामीपेक्षा तिप्पट मोठी असेल. रियो यांना स्वप्न पडले. त्यांच्या मते हे येणाऱ्या भयानक आपत्तीचा इशारा आहे. स्वप्नात त्यांना दिसले की जपानच्या दक्षिणेकडील समुद्र खवळला आहे. काही लोक या दृश्याला समुद्राखालील ज्वालामुखीच्या उद्रेकाचे लक्षण मानत आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामी येऊ शकते. हे केवळ जपानपुरते मर्यादित राहणार नाही तर फिलीपिन्स, तैवान, इंडोनेशिया आणि इतर अनेक क्षेत्रांवरही परिणाम करू शकते. आता वेंगांची ही भविष्यवाणी जर खरी ठरली तर पूर्वेकडीला किनारी देशांना हा मोठा धोका आहे.
वेंगा यांच्या या भविष्यवाणीमुळे भारतातही चिंता वाढली आहे, कारण 26 डिसेंबर 2004 रोजी इंडोनेशियन समुद्री क्षेत्रात भूकंपामुळे भारतात भयानक त्सुनामी आली होती, ज्यामध्ये दक्षिण भारतातील अनेक भाग प्रभावित झाले होते. त्सुनामी ही केवळ एक मोठी लाट नाही तर ती आपल्यासोबत विनाश, विस्थापन, आजार आणि मानसिक आघात देखील घेऊन येते. यामुळे हजारो जीव धोक्यात येऊ शकतात. म्हणून, भारतासारख्या देशांनी या संकटाला सामोरे जाण्याची तयारी करावी असे म्हटले आहे.