घरात फिश टँक ठेवणे शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगते? जाणून घ्या…

घरात कोणत्या दिशेला ठेवाल फिश टॅंक जाणून घ्या...

अनेकांना घरी मासे पाळण्याचा छंद असतो. त्यामुळे बरेचजण घरातील फिश टॅंकमध्ये विविध प्रकारचे मासे पाळतात. वास्तुशात्रातही फिश टॅंक अथवा एक्वेरियम याला विशेष महत्व आहे, कारण घरातील फिश टँकचा मनुष्याच्या जीवनात बराच प्रभाव पडतो. घरात मत्स्यालय असल्यास आपल्या घरात नकारात्मक उर्जा प्रसारित होत नाही. फिश टॅंकमधील पाण्याचा आवाज घरामध्ये सकारात्मक उर्जा आणि आनंदाचा प्रवाह वाढविण्यासाठी प्रभावी सिद्ध होतो. तसेच फिश टॅंक योग्य ठिकाणी ठेवल्यास घराची आर्थिक दृष्ट्या भरभराट देखील होते.

घरी फिश टॅंक ठेवण्याचे फायदे…

आपल्या घरात मासे असतील तर बाहेरून येणाऱ्या वाईट नजरेपासून स्वत:ला आणि आपल्या घराला सुरक्षीत ठेऊ शकतो.  मत्स्यालय ठेवणे केवळ त्या जागेचे सौंदर्यच वाढवते असे नाही तर माश्यांना पाहून मनाला स्फूर्ती मिळते, जेव्हा एखाद्याला तणाव जाणवतो, तेव्हा मत्स्यालयात तरंगत असलेल्या माशांना पोहताना पाहून त्याला सकारात्मक वाटू शकते. वास्तुच्या मते, फिश टँक, एक्वेरियमने केवळ आनंदच मिळत नाही तर घरातील सदस्यांवर येणाऱ्या सर्व आपत्ती टळतात. वास्तुच्या नियमांनुसार घरात फिश टॅंक ठेवला तर घराची भरभराट होते. फिश टॅंक जर स्वच्छ असेल आणि त्यातील मासे देखील आनंदी आणि निरोगी असतील तर तुमच्या संपत्तीत भर पडू शकते. एक्वेरियमला योग्य दिशेने ठेवल्यास त्यामध्ये फिरणारी मासे घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात. आपल्या घरात लहान मत्स्यालयात मासे ठेवणे भाग्याचे मानले जाते.

फिश टँक घरात ठेवत असाल तर त्याची योग्य दिशा कोणती हे जाणून घेऊया…

  • वास्तुनुसार फिश टँक घराच्या किंवा ऑफिसच्या उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवता येते.
  • घराच्या उत्तर दिशेला फिश टँक ठेवल्याने करिअरमध्ये प्रगतीच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. तसेत घराच्या पूर्व दिशेला ठेवल्यास जीवनात आनंद मिळतो.
  • वास्तुनुसार बेडरुममध्ये फिश टँक ठेवू नका. तसेच फिश टँकमध्ये ८-९ मासे ठेवणे शुभ मानले जाते.
  • स्वयंपाकघरात फिश टँक ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मकता वाढते. तसेच यातील पाणी वेळोवेळी बदलायला हवे.
  • वास्तुनुसार फिश टँकमध्ये गोल्डन फिश, फ्लॉवर हॉर्न आणि एंजेल फिश ठेवणे शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला फिश टँक ठेवणे शुभ मानले जात नाही.
  • तसेच वास्तुनुसार ८ सोनेरी माशांसह एक काळा मासा पाळणे शुभ प्रतीक आहे.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News