गुरुवार हा बृहस्पती देवाला समर्पित असतो आणि या दिवशी केळीच्या झाडाची विशेष पूजा केली जाते. हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही खूप फलदायी मानले जाते. असे मानले जाते की गुरुवारी केळीच्या झाडाशी संबंधित काही सोपे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केले तर गुरु ग्रह बलवान होतो आणि जीवनातील अनेक समस्या दूर होतात. चला जाणून घेऊया ते प्रभावी उपाय जे तुमचे नशीब बदलू शकतात…
गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणे

केळीच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला
गुरुवारी केळीच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. असे केल्याने गुरु ग्रहाचा प्रभाव वाढतो आणि घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे वस्त्र परिधान करावे. ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. केळीच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घाला. ज्या लोकांना विवाहामध्ये अडचणी येत असतील, त्यांनी हा उपाय केल्यास त्यांना लवकरच शुभफळ मिळते.
तुळशीचे रोप
सौभाग्याचे लेणे
विवाहित महिलांनी सौभाग्याचे लेणे (बांगड्या, कुंकू, टिकली) केळीच्या झाडावर अर्पण करून पिवळ्या धाग्याने ७ वेळा प्रदक्षिणा घालावी, असे केल्याने पतीला दीर्घायुष्य आणि सुख लाभते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)