संध्याकाळी चुकूनही करू नका ‘ही’ कामे, घरात येते गरिबी…

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी काही कामे करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे, संध्याकाळी चुकूनही पैसे देणे, तुळशीची पाने तोडणे, आणि घराचा दरवाजा पूर्णपणे बंद करणे टाळावे, असे सांगितले जाते.

वास्तुशास्त्र मानवी जीवनातील विविध पैलूंबद्दल सांगते आणि त्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या संपूर्ण दैनंदिन दिनचर्येचा देखील समावेश आहे. वास्तुशास्त्रात सूर्योदय आणि सूर्यास्ताचा काळ महत्त्वाचा मानला जातो कारण या वेळी वातावरणाची ऊर्जा विशेषतः प्रभावी असते. संध्याकाळच्या वेळी ‘या’ चुका केल्याने घराच्या आर्थिक समृद्धीवर खूप वाईट परिणाम होतो. जाणून घेऊया वास्तुशास्त्रात सूर्यास्तानंतर कोणती कामे न करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

घराचे दार बंद करू नका

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी घराचे दरवाजे बंद करू नयेत कारण यावेळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि घरात सुख-शांती येते. संध्याकाळच्या वेळी दरवाजे उघडे ठेवल्यास, देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धन, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करते.  जर संध्याकाळच्या वेळी तुमच्या घराचे दरवाजे बंद असतील तर देवी लक्ष्मी घरात प्रवेश करू शकणार नाही, यामुळे ती तुमच्यावर नाराज होऊ शकते. तसेच तुमच्या घरात नकारात्मक उर्जेचा संचार वाढेल.

तुळशीला हात लावू नका

हिंदू धर्मात मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर तुळशीला स्पर्श करणे किंवा तिची पाने तोडणे अशुभ मानले जाते. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. संध्याकाळी तुळशीला स्पर्श करणे पूर्णपणे निषिद्ध आहे. असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा कोप होतो.

कोणाकडेही काहीही मागू नका

संध्याकाळी काही विशिष्ट गोष्टी कोणाकडूनही मागणं टाळलं पाहिजे. लसूण-कांदा, मीठ, आंबट पदार्थ, सुया इत्यादी काही गोष्टी संध्याकाळी कोणाकडूनही मागू नयेत. ज्यामुळे घरात नकारात्मक गोष्टींचा प्रवेश होतो. संध्याकाळी काही वस्तू मागणं हे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतं.

पैशाचे व्यवहार करू नका

वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी पैशाचे व्यवहार करू नयेत. संध्याकाळच्या वेळी पैशाचे व्यवहार केल्यास आर्थिक अडचणी येऊ शकतात, असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळच्या वेळी पैशाचे व्यवहार केल्यास देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही, ज्यामुळे आर्थिक समस्या येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी संध्याकाळी करणे शुभ मानले जात नाही. पैशाचे व्यवहार देखील त्यापैकीच एक आहे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News