कुठेही बसल्यावर सतत पाय हलवण्याची सवय अनेकांना असते. काही जण बसल्या बसल्या पाय हलवतात. काही जण झोपल्यावरदेखील पाय सारखे हलवत असतात. यावर घरातली ज्येष्ठ मंडळी नेहमी टोकतात. बसल्यावर सतत पाय हलवणं अशुभ असल्याचं म्हटलं जातं. पाय हलवल्याने कुटुंबाचा खर्च वाढतो, असा एक समज आहे.
चंद्र ग्रहाचा अशुभ परिणाम होतो
आपले पाय हलवण्याची वाईट सवय थेट आपल्या आरोग्याशी आणि संपत्तीशी संबंधित आहे. शास्त्रानुसार उंच ठिकाणी खुर्ची, पलंग इत्यादींवर बसून किंवा झोपताना पाय हलवल्याने कुंडलीतील चंद्र कमजोर होतो. चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते.

पाय हलवल्याने पडतो नकारात्मक प्रभाव
पाय हलवल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. धनाची देवी माता लक्ष्मीच्या कोपामुळे धनाशी संबंधित कामात अडथळे येतात आणि भाग्यही साथ देत नाही. हे एखाद्या व्यक्तीच्या आनंदाची, यशाची आणि संपत्तीची पातळी कमी करते. त्यामुळे तुम्हीही असे करत असाल तर लगेच ही सवय बदला.
पाय हलवण्याच्या सवयीमुळे हे आजार उद्भवण्याची शक्यता
बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत पाय हलवल्यानेही अनेक प्रकारचे आजार जन्माला येतात. असे केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते असे संशोधनातून दिसून आले आहे. वैदीकशास्त्रात पाय हलवण्याच्या सवयीचे वर्णन रेस्टलेस लेग्स सिंड्रोम असे केले आहे आणि हा एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे हृदय, किडनी, पार्किसंस यासंबंधीत समस्या उद्भवतात आणि शरीरात लोहाची कमतरता निर्माण होण्याचिही भिती असते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )