तुमच्या घराभोवती कोणती झाडं लावण मानली जातात अशुभ? ‘ही’ झाडं लावाल तर…

अंगणात कोणती झाडं लावणं अशुभ? हे वृक्ष देतात नेहमी नकारात्मक परिणाम

Vastu Tips Of Trees : तुमच्या घराभोवती ही झाडे असणे अशुभ, वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या…

घरात झाडे ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. पण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराभोवती काही झाडे लावणे फार अशुभ मानले जाते.

चिंच : घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावणेही अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. शास्त्रांच्या मते चिंचेचे रोप घरात लावू नये. या रोपामुळे घरात वाद वाढतात. हे झाड घराभोवती लावणे शक्यतो टाळावे.

मेंदी : वास्तूनुसार मेंदीचे रोप घराभोवती कधीही लावू नये. या वनस्पतीभोवती नकारात्मक ऊर्जा फिरते असे मानले जाते . त्यामुळे हे रोप घरात लावणे टाळावे.

बोर : बोराचे झाड देखील घरासाठी खूप अशुभ मानले जाते. कारण त्यात काटे असतात. घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला बोराचे झाड असल्यास घरात नकारात्मकता येते आणि भीतीचे वातावरण राहते.

रुई : अनेकांच्या घरा जवळ रुईचे झाड पाहायला मिळते. अशी झाडे चुकूनही घरात लावू नयेत. त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीमध्ये बाधा येते आणि धनाची हानी होते. त्याच प्रमाणे कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News