वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तुंचे नियम आणि ठेवण्याचे ठिकाण ठरवले आहेत. त्यानुसार घरातील वस्तुंची मांडणी केली आहे. आपल्या घरात घड्याळ हे प्रमुख वस्तुपैकी एक आहे आणि आपल्याला त्याची गरज असते. पण या वस्तु वास्तुशास्त्रानुसार कुठे असाव्यात याचे नियम सांगितले गेले आहेत.
प्रत्येक घरात घड्याळ असते. लोक आपल्या आवडीनुसार आणि जागा बघून घरातील भिंतींवर लावतात. पण, वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. कारण वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला महत्त्व आहे, त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये घड्याळ चुकीच्या दिशेने लावले असेल तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो; याने तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो.

वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोणत्या दिशेच्या भिंतीवर घड्याळ लावाल?
- वास्तूनुसार भिंतीवर घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते. पूर्व आणि उत्तर दिशांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. या दिशेला घड्याळ ठेवल्याने वेळेचा शुभ लाभ होतो. त्यामुळे प्रगतीचे मार्ग अधिक भक्कम होतात.
- पूर्वेकडील भिंतीवर घड्याळ लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते. याशिवाय घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात सकारात्मक विचार येतात. तर घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जेचा सर्वाधिक प्रभाव पडतो. त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर कधीही घड्याळ लावू नये.
- वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कायम उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलं पाहीजे. कारण उत्तर दिशेवर धनदेवता कुबेराचं राज्य आहे. तर सर्व देवता या पूर्व दिशेला विराजमान आहेत. त्यामुळे या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात. या दोन ठिकाणी घड्याळ असल्यास त्याचे सकारात्मक परिणा मिळतात. जीवनात सुख समृद्धी राहते. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होतात.
अशा प्रकारची घड्याळं लावणं टाळा…
- घराच्या दक्षिण दिशेला चुकूनही घड्याळ लावू नये. कारण ही यमाची दिशा आहे. या ठिकाणी घड्याळ असल्यास घरात कायम आजारपण आणि आर्थिक स्थिती ढासळल्याचं पाहायला मिळतं. जर तुमच्या घरात या ठिकाणी घड्याळ असेल तर ते काढा आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा.त्याचबरोबर घरातील एखादे घड्याळ तुटले असेल तर तेही काढून टाकावे. खराब घड्याळ आणि थांबलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा दर्शवतात.
- वास्तुशास्त्रानुसार तुटलेले किंवा थांबलेले घड्याळ कधीही घरात ठेवू नये. घड्याळ बंद ठेवल्याने गरिबी वाढते. त्याच वेळी, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती खुंडते. वास्तूनुसार घरामध्ये काळ्या, निळ्या आणि लाल रंगाची घड्याळे लावू नयेत. तर हलक्या हिरव्या, तपकिरी आणि पिवळ्या रंगाचे घड्याळ घालणे शुभ मानले जाते.
- घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ते ताबडतोब दुरूस्त करा.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)