Astrology : सकाळच्या वेळी या गोष्टींचे दिसणे मानले जाते शुभ, असतात आयुष्यातील समस्या दूर होण्याचे संकेत
ज्योतिषशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, सकाळी उठल्यावर आपण आपले दोन्ही हात पाहावेत. अशी मान्यता आहे की आपल्या हातांमध्ये सरस्वती, ब्रम्हा आणि लक्ष्मी वास करतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपले हात पाहिल्याने व्यक्तीला आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. असे म्हटले जाते की सकाळच्या वेळी तुम्ही काही शुभ गोष्टी पाहिल्या, तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. तसेच, या गोष्टी पाहिल्यावर लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहते. ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.
ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.
वास्तुशास्त्रानुसार जर सकाळी उठताच तुमच्या उजव्या हाताला खाज येत असेल तर समजून जा की तुम्हाला अचानक धन प्राप्ती होणार आहे. सकाळी उठताच उजव्या हाताला खाज येत असेल तर अडकलेले पैसे पुन्हा परत मिळू शकतात. तसेच कमाईचे नवे स्त्रोत मिळतात.

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला सकाळीच कानांमध्ये चिमणी, पोपट, कोकिळा अथवा कबूतर यांचा आवाज ऐकू येत असेल तर तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येणार आहे.
सकाळ-सकाळ पांढरे फुल, हत्ती, इत्यादी गोष्टी पाहणे देखील शुभ आहे. अशा गोष्टी पाहिल्यास आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते.
वास्तुशास्त्रानुसार सकाळी सकाळी गाय मुख्य दारावर येणे शुभ मानले जाते.यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होण्याचे संकेत देतात. अशी मान्यता आहे की गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास असतो. यामुळे जेव्हा मुख्य दरवाजावर गाय आली तर हात जोडून नमस्कार करा.
सकाळी जाग येताच मंदिरातील घंटांचा आवाज ऐकू येणे, हे फारच शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला शुभ वार्ता मिळू शकते, तसेच त्याचे अडकलेले काम मार्गी लागू शकते.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)