मुंबई : आयपीएलच्या 38 व्या सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चैन्नई सुपर किंग्जने 176 धावांचे आव्हान मुंबईसमोर ठेवले. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये चैन्नईकडून पहिलाच सामना खेळणारा 17 वर्षीय आयुष म्हात्रेने सर्वांनाच प्रभावित केले.
तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगसाठी आलेला आयुषने चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 15 बाॅल्समध्ये 35 रन्स केल्या. त्याची बॅटींग पाहून सगळेच आवाक झाले. कसलेल्या बॅटरप्रमाणे त्याने संघाची गरज ओळखून पावर प्लेमध्ये जोरदार हिटींग केली. चैन्नईचा पहिला गडी अवघ्या सहा धावा असताना आऊट होऊन परतला त्यावेळी आयुष मैदानात उतरला. मात्र, संघ अडचणीत असताना त्याने टोलेबाजी करत संघावरील प्रेशर कमी केले.

14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने लखनौविरोधात पहिल्याच चेंडूत सिक्स लगावला होता. त्यामुळे तो चर्चेत आला होता. त्याच्या पाठोपाठ आयुष म्हात्रेच्या आक्रमक 35 धावांच्या खेळीने सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले.
सर्वाधिक स्ट्राईक रेट
चैन्नईकडून रविंद्र जडेचा याने याने 53 रन्सची खेळी केली. चैन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला त्यानंतर शिवम दुबेने देखील 50 रन्स केल्या. चैन्नईच्या एकुण सात फलंदाजांनी बॅटींग केली. यामध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट हा आयुषचा म्हात्रेचा राहिला. त्याने 15 चेंडून 32 रन्स केल्या त्यावेळी त्याचा स्टाईक रेट तब्बल 213.33 होता. त्याच्या एकट्याचा स्टाईक रेट 200 पार होता. चैन्नईच्या इतर एकाही बॅटरला 200 स्ट्राईक रेटने बॅटींग करता आली नाही.
आयुषचे कारकिर्द
आयुषने लिस्ट ए च्या सात मॅच खेळल्या आहेत. मुंबई रणजी संघाकडून तो ओपनिंग देखील करतो. सात लिस्ट ए मॅचमध्ये त्याने 65 च्या सरासरीने 458 रन्स केल्या आहेत. तर, गेल्या वर्षी नागालँड विरुद्ध खेळताना त्याने 117 बाॅल्समध्ये 181 रन्स फटकावले होते.