भाऊ व्यवसाय सांभाळतो, पुतण्या क्रिकेटपटू; विराट कोहलीच्या कुटुंबात कोण काय करतं? जाणून घ्या

विराट कोहली हा आज जगातील सर्वात मोठ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराटने कसोटी आणि टी-२० स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे. कोहली आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळतो. आता त्याचा पुतण्याने (आर्यवीर कोहली) देखील क्रिकेटच्या जगात प्रवेश केला आहे, आर्यवीर कोहलीने दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीच्या लिलावात आपले नाव नोंदवले आहे.

विराट कोहलीचे वडील एक फौजदारी वकील होते. त्यांचे विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच निधन झाले. विराट कोहलीची आई सरोज कोहली सध्या गुरुग्राममध्ये राहते.

विकास कोहली (विराटचा भाऊ)

विराटचा संपूर्ण व्यवसाय त्याचा मोठा भाऊ विकास कोहली सांभाळतो. विकास One8 ब्रँड देखील व्यवस्थापित करतो. तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात येत नाही.

भावना कोहली धिंग्रा (विराटची बहीण)

मोठी बहीण भावना सोशल मीडियावर सक्रिय आहे, ती सोशल मीडियावर टीम इंडियाच्या प्रत्येक मोठ्या डावासाठी किंवा महत्त्वाच्या सामन्यांसाठी विराट कोहलीचे अभिनंदन करणारे पोस्ट करते.

विराट कोहलीचा पुतण्या आर्यवीर

दिल्ली प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीच्या लिलावात विराटचा पुतण्या आर्यवीर कोहलीचे नाव नोंदवल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्यासाठी आयपीएल हे एक मोठे व्यासपीठ आहे आणि आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी, राज्यांमध्ये आयोजित अशा लीग महत्त्वाच्या आहेत. तसे, आर्यवीर कोहलीचे वय किती आहे, तो फलंदाज आहे की गोलंदाज? त्याच्याबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.

पत्नी अनुष्का अभिनेत्री आणि निर्माता

विराटची पत्नी अनुष्का शर्माला कोण ओळखत नाही, ती केवळ कोहलीची पत्नी असल्याने प्रसिद्ध नाही तर तिने याआधीच देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. ३६ वर्षीय अनुष्का शर्माने अनेक हिट चित्रपट केले आहेत, ती आता एका चित्रपट निर्मिती कंपनीशी संबंधित आहे. विराट आणि अनुष्का यांना एक मुलगी (वामिका कोहली) आणि मुलगा (अकाय कोहली) आहे.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News