क्रिकेटपटू मोहम्मद शमीला कलकत्ता हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. हायकोर्टाने आदेश दिला आहे की, शमीने आपल्या पत्नी हसीन जहां आणि मुलगी आयरा यांना दरमहा एकूण ४ लाख रुपये देखभालीसाठी द्यावे. या प्रकरणाची सुनावणी २१ एप्रिल २०२५ रोजी झाली होती आणि त्यावर आज, १ जुलै २०२५ रोजी निकाल देण्यात आला.
शमीला दरमहा खर्च करावा लागणार
कोर्टाच्या आदेशानुसार, शमीने हसीन जहांला दरमहा १ लाख ५० हजार रुपये आणि मुलगी आयरा साठी दरमहा २ लाख ५० हजार रुपये द्यावे लागतील. या दोघींच्या देखभालीसाठी शमी दरमहा एकूण ४ लाख रुपये खर्च करणार आहे.

हा वाद तब्बल ७ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे शमीला मागील सात वर्षांचे संपूर्ण रक्कमही भरावी लागणार आहे. यानुसार शमीला ७ वर्ष × १२ महिने × ४ लाख = सुमारे ३ कोटी ३६ लाख रुपये हसीन जहां आणि आयराला द्यावे लागतील.
काय आहे प्रकरण?
कलकत्ता हायकोर्टाने खालच्या न्यायालयाला आदेश दिला आहे की, पुढील ६ महिन्यांत या प्रकरणाचा निकाल द्यावा. शमी आणि हसीन जहां यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. त्यानंतर १७ जुलै २०१५ रोजी त्यांना मुलगी झाली, जिचे नाव आयरा ठेवले.
शमीला नंतर समजले की हसीन जहां आधीपासून विवाहित होती आणि तिच्या पहिल्या विवाहातून दोन मुले होती. त्यानंतर हसीन जहांने शमी आणि त्यांच्या कुटुंबावर मारहाणीचे आरोप केले आणि २०१८ पासून कोर्टातील खटला सुरू आहे. या प्रकरणात शमीला दरमहा खर्च देण्याचे आदेश यापूर्वीही मिळाले होते, परंतु हसीन जहांला ती रक्कम कमी वाटली आणि तिने अधिक पैशांची मागणी केली होती. आता कोर्टाने अंतिमतः दरमहा ४ लाख रुपये देण्याचा निर्णय दिला आहे