आयपीएलच्या रविवारच्या सामन्यात राॅयल चेलेंजर्स बंगळुरूला पंजाबला त्यांच्याच होमग्राऊंडवर पराभवाचा धक्का दिला. मागील काही सामन्यात सूर न मिळाल्याने चाचपड असलेल्या विराट कोहलीने दमदार अर्धशतक केले. त्याच्या 73 धावांच्या जोरावर बंगळुरुने पंजाबचे 158 धावांचे लक्ष सहजच गाठले. मागील सामन्यात पंजाबकडून पराभवाचा झटका बंगळुरुला करावा लागला होता. मात्र, या पराभवाचा बदला विराटने घेतला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला आश्वासक धावसंख्या गाठता आली नाही. 42 धावांवर पहिली विकेट गेल्यानंतर ठराविक अंतराने पंजाबचे फलंदाज बाद होत गेले. प्रियांश 22, प्रभसिमरन 33, शशांक सिंग 33 या फलंदाजांनी थोडाफार प्रतिकार केल्याने पंजाब 150 पार करू शकला.

कृणालने पुन्हा दाखवला जलवा
कृणाला पांड्या या सिझनमध्ये बंगळुरुसाठी ट्रम्प कार्ड ठरतो आहे. या सामन्यात देखील मोक्याची वेळी विकेट मिळवत त्याने पंजाबला बॅकफूटला ढकलले. त्याने 25 धावांमध्ये दोन जणांना आऊट केले. बंगळुरुच्या विजयाने पाँईट टेबलमध्ये ते तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. तर, पहिल्या स्थानावर गुजरात तर दुसऱ्या स्थानावर दिल्ली आहे.
विराट-पडिक्कलचा तडाखा
158 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळुरुची सुरुवात निराशजनक झाली. ओपनर फिलिप साल्ट हा अवघ्या एका रन्सवर हर्षदीपच्या बाॅलिंगवर आऊट झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी डाव सावरला. दोघांनी ही अर्धशतक झळकवत 100 भागिदारी करत बंगळुरुच्या आवक्यात विजय आणून ठेवला. पडीक्कलने आक्रमक फटके मारताना 35 चेंडून चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 61 धावा कुटल्या. तर, विराट कोहलीने संयमी खेळी करताना सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 बाॅल्समध्ये 73 रन्स केले.