रोहित शर्माचा चेन्नईला तडाखा, मुंबईचा दिमाखात विजय

मुंबई : वानखेडे मैदानावर आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चैन्नई सुपर किंग्जच्या सामान्यात मुंबईने एकतर्फी वर्चस्व गाजवले. 177 धावांचे टार्गेट रोहित शर्मा-सुर्यकुमार यादव यांच्या 114 रॅन्सच्या पार्टनरशिपमुळे सहजच गाठले. तब्बल 9 विकेट राखून हा विजय मिळवला. रोहित शर्माने 45 बाॅल्समध्ये 76 रन्स केले. त्यामध्ये त्याने चार चौकार आणि सहा सिक्स लगावले. या विजयाने मुंबई पाॅईंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

दरम्यान, पहिल्यांदा बॅटींगसाठी उतरलेल्या चैन्नईच्या सुरुवात आश्वासक झाली नाही. रचीन रवींद्र हा अवघ्या पाच रन्सवर आऊट झाला. तर दुसरा विकेट आयुष म्हात्रेच्या रुपाने पडली. आयुषने आपल्या पहिल्याच आयपीएल मॅचमध्ये 15 चेंडूत 32 रन्स केले. त्यात त्याने चार चौकार आणि दोन सिक्स मारले.

जडेजा-दुबेने सावरेल

आठव्या ओव्हरमध्ये चेन्नईची आवस्था 63-3 अशी झाली होती. मात्र, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांनी चेन्नईचा डाव सावरला. जडेजाने 35 चेंडूत 53 रन्स केल्या. तर, शिवम दुबे याने 32 बाॅल्समध्ये 50 रन्स फटकावल्या. या सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी अपयशी ठरला त्याने बुमराने त्याला तिलक वर्माकडे कॅच आऊट केले.

रोहित-सूर्यकुमार वानखेडेवर जलवा

रोहित शर्मा याने आपल्या घराच्या मैदानावार फाॅर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले. त्याने चार चौकार आणि तब्बल सहा सिक्स लगावले. तर सुर्यकुमार यादवानेही आक्रमक फटकेबाजी करत 30 बाॅलमध्ये 68 रन्स केले. त्यामध्ये त्याने पाच सिक्स लगावले. या विजयाने मागील सलग तीन सामने मुंबईने जिंकले आहेत. तसेच चैन्नई विरोधात सलग चार पराभवा

 

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News