राजस्थानचा चेन्नईवर दमदार विजय, यशस्वी, संजू सॅमसन चमकले

ipl 2025: भारतात क्रिकेटला धर्म मानला जातो. गल्लीबोळात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या परिस्थितीमुळे क्रिकेटचा महासंग्राम असलेल्या आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा सामने सुरू केले आहेत. त्यामुळे प्ले ऑफचे पण जवळपास चित्र स्पष्ट झाले असून, आता आयपीएल ही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या चेन्नई विरुद्ध राजस्थानच्या सामन्यात चेन्नईचा पुन्हा एकदा राजस्थानने पराभव करत दणदणीत विजय मिळवला.

राजस्थानचा सहज विजय…

मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 8 गड्यांच्या मोबदल्यात 187 धावा केल्या होत्या. तर मराठमोळ्या आयुष म्हात्रेने 20 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. आणि सर्वांची पुन्हा एकदा सर्वांनी मन जिंकली. 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानने विस्फोटक आणि आक्रमक अंदाजात सुरुवात केली. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशी (57) आणि यशस्वी जयसवाल (36) यांनी दमदार सुरुवात करून दिली. तर संजू सॅमसन (41) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे राजस्थानने 17.1 षटकांमध्येच आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. आणि राजस्थानने विजयावरती शिक्कामोर्तब केले.

दोन्ही संघ आयपीएलमधून बाहेर…

दरम्यान, आयपीएल मध्ये आता प्ले ऑफमध्ये जाणारे संघ निश्चित झाले आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल हे दोन्ही संघ आयपीएलमधून बाहेर फेकले गेले आहेत. औपचारिकता म्हणून या दोन्ही संघाने सामने खेळले. परंतु या सामन्यात ही राजस्थानने चेन्नईवर सहज मिळवला. तसेच चेन्नईचा मागील सामन्यात देखील पराभव झाला होता. त्यामुळे आता प्ले ऑफमध्ये चार संघांमध्ये काटे की टक्कर असून यावर्षीच्या आयपीएल चषकावर कोण नाव करणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News