PBKS vs MI Highlights : आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात पंजाब किंग्सने संघाने विक्रम करत आयपीएलच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबने मुंबईचा धुव्वा उडवत थेट फायनमध्ये धडक मारली आहे. मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबने हे आव्हान 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं.
मुंबईचे प्रथम फलंदाजी करत २०३ धावांचे टार्गेट
दरम्यान, पंजाबने टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत 203 धावा केल्या. मुंबईकडून कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 44-44 धावा केल्या. जॉनी बॅरिस्टो याने 38 तर नमन धीरने 37 धावा केल्या. गोलंदाजीत पंजाबकडून अझमलुल्लाह ओमरझई २ विकेटस घेतल्या. तर कायले जेमीन्सन, मार्कस स्टोयनिस, विजयकुमार वैशाख व युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.

श्रेयस-नेहलची मॅचविनिंग खेळी….
पंजाब किंग्सने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. दोनशेच्या पार धावांचे मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पंजाबने सहज पाठलाग केला. यात श्रेयस-नेहलची मॅचविनिंग खेळी ठरली. श्रेयस अय्यरने 41 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 5 चौकारसह नॉट आऊट 87 धावा केल्या. तर नहेल वढेरा याने 29 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. जोस इंग्लिसने 21 बॉलमध्ये 2 षटकार आणि 5 चौकारसह 38 धावा केल्या. धावा रोखण्यात मुंबईच्या गोलंदाजांना अपयश आले. अश्विनी कुमारने 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट व पांड्याने 1-1 विकेट मिळवली. त्यामुळं आता पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु यांच्यात अंतिम सामना होणार आहे. फायनल कोण जिंकणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.