बंगळुरू: आयपीएल 2025 चा सिझन आता रंगतदार वळणावर आला आहे. आयपीएलच्या या सीझनमधील 42 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्सना या सीझनमधील आपली प्ले ऑफ्सची आशा काय ठेवायची असेल, तर आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवणं अत्यंत गरजेचं असणार आहे. तर राजस्थानला या सीझनमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.
बंगळुरू Vs राजस्थान, कोण जिंकेल?
आजच्या घडीला आयपीएल पॉईंट टेबल्सचा विचार केला असता, या सीझनमध्ये खेळलेल्या एकूण 8 सामन्यांपैकी 5 सामन्यांत बंगळुरूच्या संघाने विजय मिळवला आहे, संघांकडे एकूण 10 गुण असून संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या स्थानावर आहे. तसेच संघाचा नेट रन रेट देखील चांगला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही, खेळलेल्या 8 सामन्यांपैकी राजस्थानला अवघे 2 सामने जिंकता आले आहेत…संघांकडे अवघे 4 पॉईंट्स असून संघ गुणतालिकेत 8 व्या स्थानावर आहे. राजस्थानचे या आयपीएल सीझनमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

दोन्ही संघांमधील शेवटच्या 33 सामन्यांचा विचार केला असता लक्षात येते की, 33 पैकी 16 सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आहेत. तर अवघ्या 14 सामन्यांमध्ये राजस्थानला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाचे पारडे जड मानले जात आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते आजचा सामना आरसीबी जिंकण्याची अधिक शक्यता आहे.
प्लेयिंग इलेव्हन कसं असेल?
कॅप्टन रजत पाटीदार, देवदत्त पडीकल, विराट कोहली, स्वस्तिक चिकारा, टीम डेव्हिड अशी तगडी फलंदाजी बंगळुरूच्या संघाकडे आहे. दुसरीकडे फिल सॉल्ट, जॉश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांच्यावर बंगळुरूच्या गोलंदाजीची प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे. तर राजस्थानच्या संघात संदीप शर्मा, जोफरा आर्चर, फझल फारूकी यांसारखे चांगले प्रतिभावान गोलंदाज आहेत. कॅप्टन संजू सॅमसन, नितीश राणा, शुभम दुबे, रियान पराग यांना राजस्थानची फलंदाजी सांभाळावी लागेल.