आयपीएलमध्ये आज बंगळुरू वि. चेन्नई सामना, कोणता संघ जिंकणार?

आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स अशी लढत बघायला मिळणार आहे. आरसीबीसाठी विजय महत्वाचा आहे, तर चेन्नईचा संघ या हंगामातून बाहेर पडलेला आहे.

बंगळुरू: आयपीएल 2025 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आज 52 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपली विजयाची मालिका कायम राखत प्ले ऑफ्सचं तिकिट पक्कं करणार का हे पाहणं महत्वाचं असेल, तर दुसरीकडे चेन्नईच्या संघाचं या आयपीएल सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.

बंगळुरू वि. चेन्नई कोणता संघ जिंकेल?

आयपीएलच्या चालू सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्सने जोरदार कामगिरी केली आहे. बंगळुरूने आपले सातत्य राखणे आवश्यक आहे. या हंगामात आजवर खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये संघाने विजय संपादीत केला आहे. संघ 14 गुणांसह गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच नेट रन रेट 0.521 असल्याने याचा फायदा संघाला आगामी काळात होऊ शकतो.

चेन्नई सुपर किंग्ससाठी हा सिझन तितकासा चांगला राहिला नाही. गेल्या आठवडाभरात संघाने सलग तीन पराभवांचा सामना केला आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोनी देखील संघाचे पुनरागमन घडवून आणण्यात अपयशी ठरला आहे. आयपीएलच्या या चालू हंगामात आजवर 10 सामने खेळले असून पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, 4 गुण असून संघ गुणतालिकेत सध्या 10 व्या स्थानावर आहे. नेट रन रेट वजा असल्याने संघाची प्ले ऑफ्सची दारे आधीच बंद झाली आहेत.

दोन्ही संघाचा या आधीचा इतिहास पाहिला असता लक्षात येते की, शेवटच्या 34 सामन्यांपैकी चेन्नईच्या संघाने 21 तर बंगळुरूने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा इतिहास अटीतटीचा दिसत नाही. इतिहास जरी चेन्नईच्या बाजूने झुकता असला तरी आजच्या सामन्यात बंगळुरूचं पारडं जड मानलं जात आहे.

दोन्ही संघांचे प्लेयिंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कॅप्टन), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेविड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल या खेळांडूवर बंगळुरूच्या संघाची मदार असणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स

शेख रशीद, आयुष म्हात्रे, सैम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, वंश बेदी, एमएस धोनी (कॅप्टन, विकेटकीपर), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद , मथिरा पथिराना या खेळाडूंवर चेन्नई संघाची जबाबदारी असेल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News