मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर हैद्राबाद गार! रोहित शर्मा धुव्वाधार

हैद्राबादची अवस्था पाच बाद 35 झाली होती. मात्र, हाइनरिक क्लासेन याने 71 धावांची खेळी करत डाव सावरला तर अभिनव मनोहर याने 43 धावांमुळे हैद्राबाद सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

हैद्राबाद : आक्रमक फलंदाजांची फौज सनराईज हैद्राबादकडे आहे. त्यामुळेच त्यांनी पंजाब विरुद्ध तब्बल 247 धावांचे टार्गेट सहज पार केले होते. मात्र, आज मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर हैद्राबादच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. कशाबशा 143 धावाच हैद्राबादला करता आला.

144 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईने आक्रमक सुरुवात केली पण अवघ्या 11 धावांवर रियान उनाडकडच्या बाॅलवर आऊट झाला. मात्र, दुसऱ्या बाजुने रोहित शर्माने फटकेबाजी सुरु केली. त्याने अवघ्या 46 बाॅल्समध्ये 70 धावा फटकावला. तर, सुर्यकुमार यादव याही सामन्यात चमकला. त्याने अवघ्या 19 धावात 40 धावा केल्या. त्यामुळे 15 ओव्हरमध्ये मुंबईने टार्गेट पूर्ण केले.

हैद्राबादची आघाडी कोसळली

हैद्राबादमध्ये आघाडीचे फलंदाज आक्रमक फटकेबाजी करतात त्यामुळे इतर संघातील गोलंदाजी त्यांना जर घाबरूनच असतात. मात्र मुंबईच्या बोल्ट आणि चहरने या फलंदाजांना पळती भूई थोडी केली. हेड चार, अभिषेक शर्मा 8, इशान किशन 1, नितेश रेड्डी 2 हे आघाडीचे फलंदाज दुहेरी आकडा देखील गाठू शकले नाहीत.

हाइनरिक क्लासेन सावरले’

हैद्राबादची अवस्था पाच बाद 35 झाली होती. मात्र, हाइनरिक क्लासेन याने 71 धावांची खेळी करत डाव सावरला तर अभिनव मनोहर याने 43 धावांमुळे हैद्राबाद सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. मुंबईचा बोल्ट हा हैद्राबादसाठी कर्दनकाळ ठऱला त्याने अवघ्या 26 धावा देत चार विकेट घेतल्या. जसप्रित बुमरा याने एक विकेट घेत आपला टी 20 मधला 300 धावांचा टप्पा गाठला.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News