लखनऊ: आयपीएल 2025 च्या हंगामातील 40 वा सामना आज खेळला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमनेसामने असणार आहेत. लखनऊच्या इकाना इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत हा सिझन फायदेशीर राहिला आहे. तर स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्सना हा सामना जिंकावा लागणार आहे.
दिल्ली की लखनऊ कोण जिंकेल?
दिल्ली कॅपिटल्ससाठी 2025 चा आयपीएल हंगाम आतापर्यंत चांगला राहिला आहे. या आयपीएल सीझनमध्ये दिल्लीच्या संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले असून पैकी 5 सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाला विजय मिळवता आला आहे. 10 गुणांसह संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्लीकडे रनरेट देखील चांगला आहे. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सची स्थिती तितकीशी चांगली दिसत नाही.लखनऊच्या संघाने या सीझनमध्ये खेळलेल्या 8 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. संघाकडे 10 गुण असले तरी खराब रनरेटमुळे संघ 5 व्या स्थानावर आहे.

दोन्ही संघातील शेवटच्या काही सामन्यांचा विचार केला असता 6 सामन्यांपैकी दिल्लीने 3 तर लखनऊने देखील 3 सामने जिंकले आहेत. यामुळे दोन्ही संघांतील आजचा सामना अटीतटीचा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरी लखनऊ सुपर जायंट्सचं पारडं काही प्रमाणात जड मानलं जात आहे. अलीकडच्या काही सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सने आपली लय गमावल्याचं चित्र आहे.
खेळाडूंची कामगिरी महत्वाची?
आजचा सामना जिंकायचा असल्यास दोन्ही संघांना सांघिक कामगिरीवर जोर द्यावा लागणार आहे. लखनऊचा कॅप्टन ऋषभ पंत, निकोलस पूरन, डेव्डिड मिलर यांच्यावर संघाच्या फलंदाजीची मदार असेल, तर अॅडन मार्करम, आकाश दीप, रवी बिष्णोई या गोलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्लेयिंग इलेव्हनचा विचाार केला असता लक्षात येते की, आशुतोष शर्मा, फाफ डू प्लेसिस, करून नायर, कॅप्टन अक्षर पटेल यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. तर टी. नटराजन, मिशेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव यांना गोलंदाजीची जबाबदारी खांद्यावर घेत संघाचा विजयाचा मार्ग सुकर करावा लागणार आहे.