धोनीची जादू चाललीच नाही! चैन्नईचा पराभव, हैद्राबाद सुसाट!

हैद्राबादचा गोलंदाज हर्षल पटेल याने टिच्चून बाॅलिंग करताना 28 धावात चार विकेट घेतल्या. त्याला कर्णधार कमिन्सचीही योग्य साथ मिळाली कमिन्स 21 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.

चेपाॅक : चैन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनराईज हैद्राबादच्या सामन्यात चैन्नईला पाच विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. चैन्नईकडून अवघ्या 155 धावांचे टार्गेट देण्यात आले होते. हे टार्गेट हैद्राबादने सहजच पार केले. सामन्यात हैद्राबादचे चार विकेटस पडल्यानंतर चेन्नई जिंकेल अशी आशा होती. मात्र, नितीश रेड्डीने 19 धावांची खेळी करत दणदणीत विजय मिळवून दिला.

हैद्राबाद बॅटींग करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र त्यांची सुरवात निराशजनक झाली. अभिषेक शर्मा कलीद अहमदच्या बाॅलिंगवर आयुष म्हात्रेकडे कॅच देऊन आऊट झाला. त्यानंतर आक्रमक ट्रॅव्हिस हेडला 19 रन्सवर अंशुल कंबोजने बोल्ड केले. मात्र त्यानंतर ईशान किशनने डाव सावरत 44 धावा केल्या. त्यात त्याने पाच चौकार आणि एक सिक्स मारला.

डेवाल्ड ब्रेव्हिसने चेन्नईला सावरले

चेन्नईसाठी यंदाचे आयपीएल चांगले जाताना दिसत नाही. तब्बल सहा पराभव पदरी असलेला चेन्नई आज सामन्यात देखील चाचपडताना दिसली. 74 वर मुंबईचे चार बॅटर आऊट झाले होते. त्यामध्ये आयुष म्हात्रे यांने यामध्ये 30 धावा केल्या होत्या. पाचव्या स्थानावर आलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसने संघाला सावरले त्यांनी 25 बाॅल्समध्ये 42 धावा केल्या. त्याला दीपक हुडाने साथ दिली. हुडाने 22 रन्स केल्या.

हर्षल पटेलने चैन्नईला रोखला

हैद्राबादचा गोलंदाज हर्षल पटेल याने टिच्चून बाॅलिंग करताना 28 धावात चार विकेट घेतल्या. त्याला कर्णधार कमिन्सचीही योग्य साथ मिळाली कमिन्स 21 धावा देत दोन विकेट्स घेतल्या.


About Author

Arundhati Gadale

Other Latest News