हवामान विभागाच्या राज्यातील पावसाबाबत वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार आज नागपूरसह विदर्भातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस
राज्यात आज काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी मुंबईसह काही जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांसाठी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांसाठी शहर आणि उपनगरात आकाश साधारणपणे ढगाळ असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. या दरम्यान अधूनमधून किमी प्रतितास सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातील 6 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना हवामाना खात्याने यलो अलर्ट दिला आहे. या जिल्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील स्थानिक नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
उर्वरीत महाराष्ट्राला पावसाचा ग्रीन इलर्ट आहे. त्यामुळे या भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.