लखनौवर ‘दिल्ली’ची स्वारी, 8 विकेट्सने दणदणीत विजय; के एल राहुल, मुकेश चमकले

लखनौ बॅटींग करताना पहिल्या ओव्हरमध्ये सावध सुरुवात करत अवघ्या तीन धावा केल्या. तर, दिल्लीकडून अभिषेक पोरेल आणि करुण नायर यांनी ओपनिंग करताना शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्या.

लखनौ  : आयपीएलच्या 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आले. मात्र, दिल्लीने तब्बल 8 विकेट राखून दिल्लीवर एकतर्फी विजय मिळवला. लखनौचे 160 धावांचे टार्गेट दिल्लीने सहजच पार केले.

दिल्लीकडून अभिषेक पोरल आणि के एल राहूल यांनी अर्धशतक झळकवत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अभिषेकने 36 चेंडूत 51 धावा केल्या. मार्करमने त्याला डेव्हिड मिलरकडे कॅच आऊट केले. तर, के एल राहुल याने 42 चेंडूत नाबाद 57 रन्स केले. त्याला कर्णधार अक्षर पटेलनेही साथ दिली. पटेल देखील 34 धावांवर नाबाद राहिला. तर, करुण नायरला या सामान्यात चमक दाखवता आली नाही त्याला 15 धावांवर मार्करमने बोल्ड केले.

मुकेशची भेदक बाॅलिंग

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौला दिल्लीच्या बाॅलरने चांगलेच जखडून ठेवले होते. मुकेश कुमार याने 33 धावा देत चार जणांना आऊट केले. मिचल मार्श, आयुष बदोनी, ऋषभ पंत, अब्दुल समद या चार जणांना मुकेशने पाॅव्हेलनचा रस्ता दाखवला.

पहिलीच ओव्हर महत्त्वाची

लखनौ बॅटींग करताना पहिल्या ओव्हरमध्ये सावध सुरुवात करत अवघ्या तीन धावा केल्या. तर, दिल्लीकडून अभिषेक पोरेल आणि करुण नायर यांनी ओपनिंग करताना शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा वसूल केल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये झालेल्या कुटाईने लखनौचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. आणि त्यांना 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News