मुंबई : आयपीएल 2025 ची धमाकेदार सुरवात झाली. आता निम्मे सामने झाले आहेत. सेमी फायनलमध्ये कुठले संघ जातील याचे चित्र फारसे स्पष्ट नाही. मात्र, चार सलग पराभवाचा सामना करणाऱ्या चार संघाचे आव्हान संपुष्टात येण्याचा धोका आहे.
आव्हान संपुष्टात येण्याचा धोका असणाऱ्या संघामध्ये प्रथम क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सनाराईज हैद्राबाद,राजस्थान राॅयल आणि कोलकत्ता संघाचा समावेश आहे.

चेन्नईचे सहा पराभव
चेन्नई सुपर किंग्जचा आज सामना हैद्राबाद सोबत होतो आहे. मात्र, त्यापूर्वीच्या आठ सामन्यांपैकी केवळ दोन सामने चेन्नईने जिंकले आहेत तर सहा सामान्यांमुळे पराभव स्वीकारावा लागला आहे.
हैद्राबाद बॅकफूटवर
तगडी फलंदाजी फळी असलेला हैद्राबादचा संघ या आयपीएलमध्ये मोठा धमाका करेल, असे वाटत होते. मात्र, या संघाला देखील आठ पैकी तब्बल सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
गुजरात नंबर एकवर
आयपीएलमध्ये चार संघाचे आव्हान संपुष्टात येण्याची भीती असताना सेमीफायनलमध्ये जागा बनवणाऱ्यांच्या स्पर्धेत गुजरात नंबर एकवर आहे. आठ सामन्यात सहा विजय मिळवत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे.तर दिल्लीचा संघ हा दुसर्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सच्या अपेक्षा वाढल्या
मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेत सुरवात निराशाजनक झाली होती. संघ अगदी तळाला होता. मात्र, सलग चार विजय मिळवून आता मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानवर आहे. मात्र, येथून पुढे एक पराजय देखील मुंबईसाठी संकट निर्माण करू शकतो.
( सर्व आकडेवारी चैन्नई विरुद्ध हैद्राबद सामन्यापूर्वीची )