दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना उद्या गुरुवारापासून (11 जून) खेळला जाणार आहे. हा अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
मार्नस लाबुशेन सलामीला खेळणार
डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर निवडणे एक मोठे आव्हान ठरले आहे. त्याच्या रिटायरमेंटनंतर ४ खेळाडूंना ओपनर म्हणून आजमावले गेले. आता पाचव्या खेळाडूसह ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात ओपनिंग करताना दिसणार आहे. होय, सॅम कोनस्टास, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड आणि नॅथन मॅकस्विनी यांच्यानंतर आता मार्नस लाबुशेन सलामीला खेळणार आहे.

जोश हेजलवुडचे देखील संघात पुनरागमन झाले आहे. भारताविरुद्धच्या टेस्ट मालिकेत त्याने फक्त दोनच सामने खेळले होते. IPL 2025 नंतर त्यांनी पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. कॅमेरून ग्रीनलाही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतील.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत बोलायचं झालं तर ती अत्यंत मजबूत दिसत आहे. उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन जोडीने डावाची सुरुवात करणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑलराउंडर कॅमेरून ग्रीन फलंदाजीस येईल. चौथ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ असेल. ऑस्ट्रेलियाचा टॉप ऑर्डर अत्यंत सशक्त दिसतो आहे.
पाचव्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेड खेळेल. लॉर्ड्सच्या मैदानावर तो दक्षिण आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो. सहाव्या क्रमांकावर ऑलराउंडर ब्यू वेबस्टर खेळेल. सातव्या क्रमांकावर यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवुड हे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना साथ देण्यासाठी ग्रीन आणि वेबस्टर हे मध्यमगती गोलंदाज आहेत. तर फिरकीची जबाबदारी नॅथन लायनवर असेल.
WTC फाइनलसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन:
- उस्मान ख्वाजा
- मार्नस लाबुशेन
- कॅमेरून ग्रीन
- स्टीव्ह स्मिथ
- ट्रॅव्हिस हेड
- ब्यू वेबस्टर
- अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक)
- पॅट कमिन्स (कर्णधार)
- मिशेल स्टार्क
- नाथन ल्योन
- जोश हेजलवुड